अक्षर आनंद बाल वाचक स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

मानवत / प्रतिनिधी.
अक्षर आनंद बालवाचक स्पर्धेत मानवत तालूक्यातील मानोली येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यामंदिर शाळेचे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
सविस्तर वृत्त असे की,
दिनांक 21/07/2024 रोजी परभणी येथे झालेल्या अक्षर आनंद बाल वाचक साहित्य संमेलनामध्ये उत्कृष्ट बाल वाचक स्पर्धेत सरदार वल्लभभाई पटेल विद्यामंदिर मानोली शाळेतील कु. भक्ती विष्णू काकडे हिने प्रथम,कु. अंजली अवधूत शिंदे आणि कु. श्रावणी राजेंद्र सुरवसे यांनी द्वितीय क्रमांक तर कु. प्रतीक्षा सुरेश शिंदे हिने तृतीय क्रमांक पटकावला.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री गणेश शिंदे सर तसेच राजेंद्र शिंदे सर यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री डी एन जाधव सर तसेच डी.जे. राऊत सर, के. व्ही. जाधव सर, एल. एन. पौळ सर, पी.बी. भरोसे सर यांनी यावेळी सर्वांचे कौतुक केले.
हे यश म्हणजे गुरूपौर्णिमेची विद्यार्थिनींनी दिलेली अमूल्य अशी भेट म्हणावी लागेल..
*००००००००*