जिल्हा कार्याध्यक्ष प्रसाद पौळ यांनी साधला प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्याशी संवाद
मानवत / प्रतिनिधी.
*पत्रकार* सुरक्षा समितीच्या वतीने गेली अनेक वर्षांपासून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन उपोषण निवेदन करत असून राज्यातील पत्रकारांचे बाबतीत युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता यादीवर नसलेल्या सर्वच वृत्तपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना राज्यातील पत्रकारांवर दाखल केलेल्या खंडणी सारख्या गुन्ह्यात स्वतंत्र अधिकाऱ्यां मार्फत चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण इत्यादी विषयावर पत्रकार सुरक्षा समिती वारंवार आंदोलन उपोषण व निवेदन करून राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहे.
पत्रकार सुरक्षा समितीचे परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रसाद पौळ यांनी नुकतीच सोलापूर येथे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांची भेट घेऊन पत्रकारांच्या अनंत अडी अडचणी व जिल्हातील पत्रकारांचे ज्वलंत प्रश्नावर यावर विचार विनयम केले यावेळी. परभणी जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्याकडे लक्ष देऊन त्या शासनदरबारी मांडून जलद गतीने सोडवणार असल्याचे यावेळी बोलतांना सांगितले आहे.
***