ताज्या घडामोडी

हलके मोटार वाहन संवर्गातील* *वाहन नोंदणीसाठी एमएच 26-सीपी नविन मालिका

नांदेड, दि. 19 जुलै :- परिवहन्नेतर संवर्गातील हलके मोटार वाहन (LMV-NT) वाहनांसाठी एमएच26-सीपी (MH26-CPG) ही नविन मालिका सोमवार 22 जुलै पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर व ईमेलसह) अर्ज सोमवार 22 जुलै रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 22 जुलै रोजी दुपारी 4 वाजता Text message किंवा दूरध्वनीद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. सर्वांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.