https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
सामाजीक

अतिक्रमणाकडे ग्राम पंचायत प्रशासनाचे दूर्लक्ष त्यामूळे आरोग्याचा प्रश्न गंभीर.

सावरगांव ग्रामपंचायतीच्या कार्य क्षेत्रातील बे- कायदा अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांचे उपोषण.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालूक्यातील सावरगाव ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रम करण्यात आले असून या कडे ग्राम विकास अधिकारी यांचे दूर्लक्ष होत आहे.
नागरिकांनी वेळो वेळी ग्राम पंचायत प्रशासनाकडे तक्रार केली असून ही याकडे दूर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी उपोषणाचा मार्ग अवलंबविला आहे.
प्रशासनाने खबरदारी घेऊन तात्काळ अतिक्रमण काढून योग्य कारवाई करावी व जनतेचे आरोग्य आबादीत राखावे व गावात शांतता ठेवण्यासाठी उपाय योजना करावी अशी मागणी अमोल तानाजी घाटूळ यांच्यासह नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहे.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत तालूक्यातील सावरगांव ग्राम पंचायतीचा कारभार दिवसोन दिवस वादाच्या भवर्‍यात सापडत असून त्या मूळे गावात अशांततेचे वातावरण निर्माण होत आहे.
तर ग्राम विकास अधिकारी यांचे दूर्लक्ष होत असल्याने गावात अतिक्रमण करणार्‍याचे मनोबल वाढत आहे. या विषयी नागरिकांनी विनंती अर्ज केला. मौजे सावरगाव (खु.) येथील रहीवासी आहे. आमच्या गावातील वार्ड क्रं. 2 मधिल नामे 1) शेषेराव घाटुक 2) नरहरी समिंद्रे ३) विश्वनाथ घाटुक 4) बबन जाधव 5) शिवाजी घाटुक 6) चिंटू घाटुक या सर्वांनी मिळून नालीचे पाणी रोड नाली फोडून माझे शेतामध्ये सोडले आहे. या पाण्यामुळे माझ्या शेताचे नुकसान होत असुन व रस्त्याचे सुध्दा नुकसान होत आहे. सावरगांव (खु.) येथील गावात जाणे-येणे करणेसाठी तसेच शेतात ये-जा करण्या साठी ज्या मेन रस्ता हा 50 ते 60 फुट रुंद असुन सदरील रस्त्याचा वापर सर्व

नागरीक करीत होते तो सदरील रस्ता हा या वरील लोकांनी अडवुन अतिक्रमण म्हणजेच रख्यावर नरहरी समिंद्रे याने स्वतःला राहण्यासाठी पक्के घर बांधले आहे. तसेच वाकी लोकांनी सदरील रस्त्यावर नाल्या बुजवून त्यावर पत्रे टाकण्यात आली तसेच त्या रस्त्यावर उकीरडा सुध्दा करण्यात आला आहे. आणि रस्त्यावर लोकांना त्रास व्हावा या उद्देशाने रस्त्यावर जनावरे बांधून त्या जनावरांचे ने शेण-मुत्र व शेण त्या रस्त्यावर टाकुन सदरील रस्ता हा चिखलाने घाण करुन टाकला आहे. कारण की, सदरील रस्त्याने हे लोक ये-जा करीत नाहीत त्यांना त्यांची दुसरी वाट आहे, परंतु गावातील ईतर लोकांना त्रास व्हावा म्हणुन सदरील लोक हे त्या रस्त्यावर घाण टाकुन लोकांची गैरसोय करीत आहेत, परंतु मी यापुर्वी दि. 05/02/2011, दि. 03/10/2023 रोजी मा. ग्रामसेवक साहेब ग्राम पंचायत कार्यालय, सावरगाव (खु.) यांना लेखी अर्ज करुन देखील सुध्दा या लोकांवर कोणतीही कायदेशिर कारवाई झालेली नसल्यामुळे ग्राम पंचायत कार्यालयसमोर दिनांक- 11/12/2023 रोजी अमरण उपोषणास बसणार असुन उपोषणाच्या काळात माझ्या जिवीतास काही हानी झाल्यास त्याची सर्वस्वी जवाबदारी शासनावर राहील याची योग्य ती दखल घेण्यात यावी.
अशी मागणी उपोषण कर्त्यांनी केली आहे.
प्रशासन काय दखल घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704