यशवंत महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर समाजशास्त्र विभागात PM-USHA योजनेअंतर्गत एका विद्वत व्याख्यानाचे आयोजन

नांदेड:नांदेड येथील श्री शारदा भवन शिक्षण संस्था संचलित यशवंत महाविद्यालयाच्या पदवी आणि पदव्युत्तर समाजशास्त्र विभागाच्या वतीने एका विद्वत व्याख्यानाचे आयोजन PM-USHA योजनेअंतर्गत दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे सदरील व्याख्यान या योजनेतील soft component या घटकांतर्गत घेण्यात येणार आहे
सदरील विद्वत व्याख्यानासाठी व्याख्याते म्हणून डॉ.सुभाष किशनराव पवार, दत्तात्रय पुसदकर कॉलेज नांदगाव पेठ, जिल्हा अमरावती हे उपस्थित राहणार आहेत.सदरील व्याख्यानाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश चंद्र शिंदे हे राहणार असून सदरील विद्वत व्याख्यानात दोन सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल सदरील व्याख्यान 12 सप्टेंबर 2025 रोजी महाविद्यालयाच्या सामाजिक शास्त्र ICT Hall या ठिकाणी सकाळी ठीक 9.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे.
सदरील व्याख्यानासाठी समाजशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.बी एम कांबळे आणि विभागातील प्राध्यापक डॉ.बी आर भोसले तसेच प्रा .शंकर मार्कड व प्रा.पूजा मिरगेवार व विभागातील विद्यार्थी परिश्रम घेत आहेत