एम सी आर

ऑन जॉब ट्रेनिंग प्रक्रिया सकारात्मकतेने फलदायी करावी* -प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे

Uncategorized

*ऑन जॉब ट्रेनिंग प्रक्रिया सकारात्मकतेने फलदायी करावी*
-प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे
नांदेड (दि. १७ ऑक्टोबर २०२६)
ऑन जॉब ट्रेनिंग प्रक्रियेमध्ये कॉपी-पेस्ट करू नये. जे आस्थापना विद्यार्थी आणि प्राध्यापक निवडतील त्यातील सध्या प्रक्रियेत असलेल्या प्रकल्पावर कार्यप्रशिक्षण व्हावे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी ऑन जॉब ट्रेनिंग प्रक्रिया संबंधित असून त्यामध्ये सर्वांनी सकारात्मकतेने क्रियाशील राहून फलदायी करावी, अशी अपेक्षा माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. यांनी शिंदे यांनी व्यक्त केली.
नांदेड डिस्ट्रिक्ट लीड कॉलेज अँड क्लस्टर कॉर्डीनेशन युनिट: दोन अंतर्गत ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिपची परिणामकारक अंमलबजावणी या एक दिवसीय कार्यशाळेच्या अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते.
प्रमुख मार्गदर्शक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्राचे अधिष्ठाता डॉ. हरिश्चंद्र पतंगे यांनी, मानव्यविद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या उपविषयावर कार्य करणे अपेक्षित आहे, ते पीपीटीद्वारे स्पष्ट केले.
याप्रसंगी डॉ. कांमळजकर, बळीराम पाटील महाविद्यालय, किनवटचे प्राचार्य डॉ. शिवराज बेंब्रेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रश्नोत्तर सत्रात डॉ. संजय ननवरे, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.एम.ए. बशीर, डॉ.प्रवीणकुमार मिरकुटे, डॉ.संदीप पाईकराव, डॉ.संजय जगताप, डॉ. एस. एम. दुर्राणी, डॉ. मीरा फड, डॉ. बी. बालाजीराव, डॉ. अजय मुठे आदींनी सहभाग घेतला.
सूत्रसंचालन डॉ.मदन अंभोरे यांनी केले तसेच आभार देखील मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी ऑन जॉब ट्रेनिंग समिती सदस्य प्रा. भारती सुवर्णकार, डॉ.स्वाती मदनवाड, प्रा. नारायण गव्हाणे आणि इनोव्हेशन इंक्युबॅशनचे समन्वयक डॉ.परमेश्वर चिकटे, डॉ. माधव दुधाटे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक गजानन पाटील व प्रकाश शिंदे, जगन्नाथ महामुने यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास प्राध्यापकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share

Related posts

यशवंत ‘मध्ये इंग्रजी विभागातर्फे शिक्षक दिन उत्साहात संपन्न

Chief Editor

नांदेडमध्ये घरफोडी प्रकरणाचा छडा तीन आरोपी अटकेत • रोख रक्कम जप्त

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात आशाताई जाधव (शिंदे) यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Chief Editor

राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपण

Chief Editor

यशवंत ‘ मधील डॉ.मीरा फड यांची राज्यस्तरीय निवड

Chief Editor

Leave a Comment