एम सी आर

राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपण

Uncategorized

नांदेड, दि. १४ ऑगस्ट २०२६ : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) समन्वयक, दिल्ली यांच्या निर्देशानुसार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कुलगुरू प्रा. डॉ. मनोहर चासकर आणि प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुल परिसरात कुलसचिव डॉ. डी. डी. पवार यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, हरित परिसर निर्मिती आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. प्रमोद लोणारकर, वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजेश शिंदे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, रासेयो संचालक डॉ. मारोती गायकवाड, माहिती व जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, डॉ. बी. एस. जाधव, अभियंता तानाजी हुसेकर, डॉ. शालिनी कदम, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. शिवाजी गायकवाड यांच्यासह संकुलातील प्राध्यापक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ परिसर रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. नंदकुमार बोधगिरे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या वृक्षारोपण उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.

Share

Related posts

पदवी प्रथम वर्ष प्रवेशाची अंतिम मुदत २० ऑगस्टपर्यंत वाढविली

Chief Editor

ओशो ध्यानधारणेने गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न

Chief Editor

नांदेडमध्ये अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; ५.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Chief Editor

संवादकौशल्य विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त — प्राचार्य डॉ. एम. वाय. कुलकर्णी

Chief Editor

निरोगी जीवनाचा मंत्र : योग

Chief Editor

छत्रपती शिवाजी महाराजांना इतिहासात नव्हे, विचारांत जगा — डॉ. भारती मढवई

Chief Editor

Leave a Comment