एम सी आर
Uncategorized

ओशो ध्यानधारणेने गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न

नांदेड:(दि.२९ जुलै २०२६)
भगवान रजनीश (ओशो) मेडिटेशन इंटरनॅशनल कम्युनमध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त विविध ध्यान प्रयोगांमध्ये ध्यानसाधक मग्न झाले.
याप्रसंगी नृत्य ध्यान, मौन ध्यान, लिसनिंग मेडिटेशन, सायलेंट सीटिंग, प्रवचन, संध्या सत्संग आदी ध्यानधारणेमध्ये साधकांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी भगवान रजनीश यांच्या श्री. गुरुनानक देवजी यांच्यावरील ‘एक ओंकार सतनाम’ या प्रवचन मालिकेतील गुरुचे महत्व स्पष्ट करणारे प्रवचन भक्तीभावनेने साधकांनी श्रवण केले.
या महोत्सवात संगीता देशमुख, प्रीतम, सरिता पनाड, प्रा. महेंद्र देशमुख, डॉ.अजय गव्हाणे, लक्ष्मीकांत वानखेडे आदी साधकांनी सहभाग घेतला.
महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी भगवान रजनीश यांच्या हस्ते पन्नास वर्षांपूर्वी संन्यासीत स्वामी गोपाल भारती, स्वामी प्रशांत, सुगंधा नागराज भट, अधीक्षक गजानन पाटील आदींनी सहकार्य केले.

Share

Related posts

नांदेडमध्ये भरदिवसा खून; इंदिरानगर परिसरात खळबळ

Chief Editor

प्लॉस्टीकमुक्त कॅम्पस करण्याची शपथ व प्लॉस्टीकची होळी

Chief Editor

भगवान रजनीश कम्यूनमध्ये सक्रिय ध्यान अभियानास उत्साहात प्रारंभ

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये शोधचक्र प्रणालीवर ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन

Chief Editor

महाराष्ट्रात 3 दिवस दुखवटा…. सुट्टी जाहीर

Chief Editor

बोली भाषा सामान्य जनांची सहज, सुंदर अभिव्यक्ती: डॉ.पृथ्वीराज तौर.

Chief Editor

Leave a Comment