एम सी आर
Uncategorized

अर्थशास्त्रातील करिअर संधीवर प्राध्यापक सागर कोंडेकर यांचे मार्गदर्शन कौशल्य विकासावर भर देण्याचे आवाहन

नांदेड : बदलत्या आर्थिक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात अर्थशास्त्र विषयाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपर्यंत मर्यादित न राहता स्पर्धा परीक्षा, संशोधन, बँकिंग, वित्तीय संस्था, उद्योग, नागरी सेवा आणि विविध शासकीय क्षेत्रांतील करिअरच्या संधींचा अभ्यास करून स्वतःला सक्षम बनवावे, असे प्रतिपादन प्रा. सागर कोंडेकर यांनी केले.

यशवंत महाविद्यालय, नांदेड येथील अर्थशास्त्र विभागामार्फत आयोजित सत्रारंभ कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मा.प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे उपस्थित होते

प्रास्ताविकात अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी.आर मुठे यांनी सत्रारंभ कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक, संशोधन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास तसेच अभ्यासपूरक उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांनी या सर्व संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रा. सागर कोंडेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात अर्थशास्त्र विषयातील रोजगाराच्या बदलत्या संधी, डेटा विश्लेषण, सार्वजनिक धोरण, आर्थिक संशोधन, बँकिंग, वित्तीय सेवा, उद्योजकता आणि स्पर्धा परीक्षांमधील अर्थशास्त्राचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात सातत्य, जिद्द, चिकाटी आणि गुणवत्तापूर्ण अध्ययनाची सवय जोपासल्यास कोणतेही ध्येय गाठणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी अर्थशास्त्र हा समाज आणि राष्ट्राच्या विकासाशी निगडित महत्त्वाचा विषय असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच कौशल्य विकास, संशोधनाची वृत्ती आणि सामाजिक बांधिलकी जोपासून विभागामार्फत आयोजित विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यशवंत महाविद्यालय हे मराठवाड्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर पी. आर. मुठे डॉ.डी डी भोसले डॉ. ज्ञानेश्वर पुपलवाड डॉ. प्रवीण कुमार सेलूकर डॉ. संतोष पाटील डॉ. शिवराज आवळे प्रा. राहुल लिंगमपले प्रा. नयना देशमुख तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन विभागातील डॉक्टर डी डी भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर ज्ञानेश्वर पुपलवाड यांनी केले
सत्रआरंभ कार्यक्रमातील या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र विषयातील विविध करिअर संधी, कौशल्य विकासाचे महत्त्व आणि स्पर्धात्मक युगात स्वतःला सक्षम बनवण्याचा प्रेरणादायी संदेश मिळाला उपस्थित विद्यार्थ्यांनी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारून आपल्या शंकाचे निरसन करून घेतले

Share

Related posts

स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने विद्यापीठात ‘पीएच.डी. एंड-टू-एंड’ सॉफ्टवेअर पोर्टलचा शुभारंभ

Chief Editor

पश्चिम विभागीय खो-खो स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विजयी*

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दाताळा कंधार तालुक्यात प्रथम

Chief Editor

मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात सुरूपरीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी दक्षता पथक कार्यर

Chief Editor

नेताजी सुभाष विद्यालयाच्या प्रांगणावर संगीतम कवायतीचे संचलन

Chief Editor

हिंदी विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. अनीता दिगंबर सिंह रावत यांचे निधन

Chief Editor

Leave a Comment