https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
राजकीय

बेघर व अतिक्रमण धारकांसाठी वंचितचे तहसिल समोर आमरण उपोषण

गडचिरोली,प्रतिनिधी :-

         गडचिरोली शहरातील बेघर व अतिक्रमण धारकांना जागेचे पट्टे देण्यात यावे यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतिने  तहसिल कार्यालय समोर  ( सोमवार दि,25 जुलै 2022 ) पासून आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे.

 उपोषणाला  वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभर्णे यांच्या नेतृत्वात भोजराज रामटेमटेके , तुळशिराम हजारे, विश्वनाथ बोदलकर, विशाल सिडाम, प्रभाकर जुनघरे, गोपाळ मोटघरे, दिलीप पेटकूले, मलय्या कालवा, वासुदेव हजारे, यादव मेश्राम, रविंद्र नैताम, कवडू पातर, क्रिष्णा शेंडे, नामदेव भांडेकर, दिगांबर डेकाटे, परसराम भोयर , गजानन मेश्राम , महादेव नैताम, सोमनाथ लाकडे, नजीर शेख, ईमरान शेख, करण भजबूजे, महेश सोनवाने, निलकंट मेश्राम, गजानन मेश्राम, क्रिष्णा मेश्राम, रविंद्र बुरांडे, लक्ष्मण नैताम, रमेश चिकराम,योगेश बुरांडे, आनंदराव कुळमेथे, जयंत मेश्राम, रविंद्र सहारे, आकाश भरडकर, मनिषा वानखेडे, मंगला भरडकर, वंदना वाढई, वर्षा कलमुलवार, अज्जू पठाण, साजिदा पठाण, माया वाळके, कौशल्या खोबरे, शशिबई गोरे, जयवंता मगरकर, शकुंतला भोयर कमलबाई बुरंडे, मंदा मेश्राम, भूमिका मेश्राम, माधूरी भोपये, बेबिबाई चि्तराम, वर्षा बुरांडे, शशिकला टतलावार, ईंदिरा डहारे , वर्षा हलदर, ललित नंदगिरवार, पार्वता मेश्राम, भैय्याजी आत्राम, कुसूम कांबळे, लता रामटेके, संघमित्रा राजवाडे, जाईबाई भजभूजे, निर्मला टेंभुर्णे, अहिल्या सहारे आदि शेकडो बेघर व अतिक्रमण धारक आमरण उपोषणाला बसले आहेत,

         गडचिरोली ग्रामपंचाय असतांना सन 1980-81 व 1981-82 मध्ये शासनाने शहरातील गोकुलनगर व इंदिरानगर क्षेत्रात बेघर धारकांना 131  घरे बांधून दिले तेव्हा आठ – दहा लाभार्थ्याना तत्कालीन तहसिलदार फाळके यांनी जागेचे पट्टे दिले व उर्वरितांना नंतर पट्टे देऊ असे सांगितले परंतु गेल्या चाळीस वर्षासून आजतागायत जागेचे पट्टे मिळालेले नाही, तसेच  गेल्या विस- पंचविस वर्षाआधिपासून शहरातील शासकिय जागेवर अतिक्रमण करून हजारो नागरिक घरं बांधून वास्तव्य करीत आहेत परंतु त्यांना सुद्धा जागेचे पट्टे मिळालेले नाही बेघर व अतिक्रमण धारकांना जागेचे पट्टे देण्यात यावे याकरीता वंचित बहुजन आघाडीच्या वतिने 10 जानेवारी 2020 मध्ये मोर्चा काढण्यात आला होता, त्यानंतरही सतत दोन अडीच वर्षे संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात आले परंतु निगरगठ्ठ प्रशासनाने दखल घेतली नाही व उलट आमच्याकडे बेघरांचा कोणताही दस्तावेज उपलब्ध नाही असे पत्र दिले, त्यामूळे प्रश्न पडतो की बेघर कोणी बांधून दिले ? परंतु ज्या आठ – दहा लाभार्थ्यांना जागेचे  पट्टे देण्यात आले ते तत्कालीन तहसिलदार फाळके  यांच्या मार्फत देण्यात आले मग बाकिच्यां बेघर लाभार्थ्यांना व अतिक्रमण धारकांना सुद्धा तहसिलदारांनी जागेचे पट्टे द्यावे याकरीता संविधानिक मार्गाने आमरण उपोषण करण्यात येत आहे .

         गडचिरोली शहरातील बेघर धारक व अतिक्रमणधारकांनी जागेचे पट्टे देण्यात यावे या हक्क आणि अधिकाराच्या मागणीसाठी  शेकडोच्या संख्येने आमरण उपोषणात सहभागी झाले आहेत,

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704