https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांच्या मार्गदर्शनाखाले मतदान जन जागृती रॅलीचे आयोजन*

मानवत //प्रतिनिधी.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मानवत नगर परिषदे च्या वतीने शहरांमध्ये वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जनजागृती मोहिमेचे आयोजन मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांच्या मार्गदर्शनाखाले करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की,
आज दिनांक 19 एप्रिल रोजी मानवत नगर परिषद मानवत व नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या वतीने मतदान जन जागृती करण्यासाठी मानवत शहरामध्ये मतदान जनजागर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या मोहिमेच्या अनुषंगाने अधिक माहिती देताना मानवत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी यावेळी बोलतांना सांगितले की मानवत शहरातील मतदानाची टक्केवारी वाढावी व लोकशाही बळकट करण्यासाठी शहरातील सर्व स्तरातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजवावा. यासाठी मानवत नगरपरिषदेच्या वतीने वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मतदान जनजागृती चे काम करण्यात येत आहेत. मानवत नगर परिषदेच्या वतीने घंटागाड्यावरती जिंगल स्टोन्स च्या माध्यमातून जनजागृती मोहीम गेल्या 20 मार्च 2024 पासून राबविण्यात येत आहे तसेच शहरातील मुख्य रस्ते ,बाजार पेठा,बसस्थानक, या ठिकाणी तसेच शहरातील सर्व शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी बॅनर, होल्डिंग लावण्यात येऊन जनजागृती करण्यात येत आहे तसेच मानवत नगरपालिकेच्या वतीने महिला बचत गटाच्या माध्यमातून शहरातील सर्व परिसरात बैठका घेऊन मतदान जनजागृती करण्यात येत आहे तसेच सीआरपी मार्फत डोअर टू डोअर जाऊन मतदान करण्यासाठी चे अहवान करण्यात येत आहे जनजागृतीचा एक भाग म्हणून मानवत नगर परिषदे च्या वतीने स्वाक्षरी मोहीम व सेल्फी स्टॅन्ड च्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येत आहे.
जनजागृती मोहिमेच्या अनुषंगाने आज नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या मुख्यालया पासून ते बसस्थानक परिसर,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर ते मानवत नगर परिषद कार्यालय पर्यत प्रभात फेरी जनजागर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी सह मानवत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एन बी सिसोदिया, श्री, ऊध्दवरावजी हरकाळ , विश्वनाथ बुधवंत, ज्ञानेश्वर कौसाईतकर, सदाशिवराव होगे पाटील ,काचगुंडे ,सोनटक्के,गणेश सिरसकर, रमेश मुलगिर, बाळासाहेब नाईक यांच्या सह मानवत नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक भगवानराव शिंदे, भारत पवार, लेखापाल श्री मारोतीसा खोडवे, महेश कदम,शहर अभियंता श्री सय्यद अनवर ,एस बी उन्हाळे,हनुमंत बिडवे,रवी दहे,संतोष खरात, शतानीक जोशी,राजेश शर्मा,मनमोहन बाराहाते, नारायण व्यवहारे, भगवान बारटक्के,संजय रुद्रवार,श्रीमती वंदना इंगोले,शीतल सोळंके,वाडकर,पल्लोड श्री विनय आडसकर,एस एस काळे, नारायण काळे,मुंजाजी डोळसे, सचिन सोनवणे, यशपाल भदर्गे, रितेश भदर्गे ,शेख वसीम ,सयद जावेद,,सुनील कीर्तने,संजय कुऱ्हाडे ,दीपक भदर्गे ,बाळू लाड, बळीराम द हे , आलीम अन्सारी , यांचे सह मानवत नगर परिषदेचे कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने सहभागी होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704