https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

साईबाबाच्या जन्मस्थळीसाठी येथे उतरा.* *भाविकभक्तासाठी पाण्याची वाणवा रेल्वे प्रबंधकाचे दूर्लक्ष.

मानवत // प्रतिनिधी.
मानवत, पाथरी, सोनपेठ या तीन तालूक्याला संभाजीनगर, मूंबई, नांदेड ला जोडणारा मानवतरोड रेल्वे स्टेशन हा दूआ असून या रेल्वे स्टेशन वर मात्र सामान्य साईभक्त व रेल्वे प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची वाणवा असल्या मूळे रेल्वे प्रवाशांसह साई भक्तांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. रेल्वे प्रबंधकाचे लक्ष नसल्याने अनेक समस्यांच्या विळख्यात मानवतरोड रेल्वे स्टेशन अडकले आहे.*
*मानवतरोड रेल्वे स्टेशन वर हजारो साईभक्त साईबाबांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी रेल्वेने परराज्यातून येत असतात तसेच मानवत रोड रेल्वे स्टेशन मधून रामेश्वर ते द्बारका , नांदेड , ते अमृतसर , दिल्ली, मुंबई, संभाजी नगरकडे हाजारो प्रवाशी व ये जा करीत असतात. मानवतरोड पाथरी , सोनपेठ, मानवत या तीन तालूक्यातील मध्यवर्ती रेल्वेस्टेशन असल्यामूळे हाजारो प्रवाशी संभाजीनगर नांदेड प्रवास करतात. पण रेल्वेस्टेशन मध्ये पिण्याचे शूध्दपाणि उपलब्ध नसल्यामूळे प्रवाशांची हेळसांड होत आहे.*
*ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना थंडगार पाणि मिळत नसल्या नसल्यामूळे नाराजीचा सूर निघत असून रेल्वे प्रवाशी संघटना लक्ष देतील का ? असा प्रश्न प्रवाशांमधून व्यक्त केला जात आहे.*

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704