पंकज उदास मंचावर विद्यार्थिनींच्या वक्तृत्वाचा प्रभावी आविष्कार!
‘युद्ध नको, बुद्ध हवा’, ‘अमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि युवा पिढी समोरील आव्हाने’, ‘हवामान बदल: मानवी अस्तित्वासमोरील नवे आव्हान’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयांवर स्पर्धकांनी मांडले विचार
पंकज उदास मंचावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या प्रभावी वक्तृत्वशैलीतून सामाजिक, वैचारिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांवर विचार मांडले. ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयांवरील विचारमंथनातून विद्यार्थी-विद्यार्थिनींची अभ्यासपूर्ण मांडणी आणि वक्तृत्वकौशल्याचे दर्शन घडले.
या वक्तृत्व स्पर्धेत महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथील श्वेता श्याम माने, ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी येथील श्रद्धा अशोक खरोडे, तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील प्रियंका निखाते यांनी सहभाग नोंदविला. ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ या विषयाच्या अनुषंगाने शांतता, मानवता, बंधुभाव आणि भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
तसेच नारायणराव वाघमारे महाविद्यालय, आखाडा बाळापूर येथील तेजस्विनी माधवराव अवचार यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर आपले विचार मांडले. आधुनिक युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचे वाढते महत्त्व, तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या संधी आणि भविष्यातील संभाव्य आव्हाने या विषयांकडे त्यांनी लक्ष वेधले.
या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थिनींना आपले विचार निर्भीडपणे व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले.
