एम सी आर
Uncategorized

पत्रकारांसाठीच्या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे कुलगुरूंचे आवाहन

नांदेड:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंपर्क कार्यालय, आय.क्यू.ए.सी., पी.एम. उषा आणि माध्यमशास्त्र संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने “आधुनिक पत्रकारिता” या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा बुधवार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली असून ती आज संपन्न होणार आहे. या कार्यशाळेस पत्रकार बांधवांसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले आहे.
या कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन तसेच व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य व कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा विद्यापीठ व माध्यम क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
दोन सत्रांमध्ये होणाऱ्या या कार्यशाळेत लोकशाही, मुंबईचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील, दै. सकाळ, पुणे येथील ज्येष्ठ संपादक व विचारवंत डॉ. श्रीराम पवार, दै. लोकमत, छत्रपती संभाजीनगरचे संपादक नंदकिशोर कुमार पाटील, तसेच न्यूज १८ मराठी, मुंबई येथील सहसंपादक फराह खान, मॅक्स वुमन चॅनेलच्या संचालिका प्रियदर्शनी हिंगे, दै. सकाळ, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय संपादक संतोष शाळीग्राम आणि आयक्यूएसीचे संचालक डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी हे मार्गदर्शन करणार आहेत.
विद्यापीठ परीक्षेत्रातील पत्रकार बांधवांसाठी आयोजित या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नवोपक्रम, नवसंशोधन व सहाचार्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, आयक्यूएसीचे संचालक डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम आणि माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. सुहास पाठक यांनी केले आहे.
——————————————-

Share

Related posts

विकसित भारतासाठी व्यसनमुक्त युवकांची आवश्यकता -माजी राज्यमंत्री मा.श्री.डी.पी.सावंत

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये वाणिज्य व व्यवस्थापनातील विविध अभ्यास मंडळाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

Chief Editor

प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे हैदराबाद येथे राष्ट्रस्तरीय प्लॅटिनम पारितोषिकाने सन्मानित

Chief Editor

घरफोडी प्रकरणातील आरोपी १२ तासांत जेरबंद; १९.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Chief Editor

तहसिलदार* पांडूरंग माचेवाड यांच्या हस्ते सोमवारी तहसिल प्रांगणात शासकीय ध्वजारोहन

Chief Editor

ज्योतिरादित्या मुठ्ठे ची राज्यस्तरीय किंकबॉक्सिंग स्पर्धेत दोन रौप्य पदकांना गवसंनी

Chief Editor

Leave a Comment