एम सी आर
Uncategorized

श्रद्धेय कै. डॉ. शंकररावजी चव्हाण जयंतीनिमित्त ‘यशवंत ‘ मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

नांदेड:(दि. २८ जुलै २०२६, मंगळवार)
भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री आधुनिक भगीरथ कै. डॉ. शंकररावजी चव्हाण जयंतीनिमित्त श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्या वतीने दि. २९ जुलै, बुधवार रोजी सकाळी ठीक दहा वाजल्यापासून रक्तदान शिबिर संपेपर्यंत यशवंत महाविद्यालयातील ॲम्फिथिएटर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीचे सहकार्य याप्रसंगी लाभणार आहे.
तरी या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे; असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे, बीटीओ डॉ.प्रांजल नरवाडे, डॉ. धनश्री केंद्रे, समाजसेवा अधीक्षक सुनीत आवटे कुणाल महागडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.साईनाथ बिंदगे, डॉ. रत्नमाला म्हस्के, डॉ.शिवाजी सूर्यवंशी, एनसीसी लेफ्टनंट प्रा.श्रीकांत सोमठाणकर, प्रा.प्रियांका सिसोदिया, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनी केले आहे.

Share

Related posts

जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त स्व-गणना करावी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chief Editor

मांडवीत बालमित्र मेळावा संमेलन उत्साहात; 23 वर्षांनंतर मित्रांची भावनिक भेट

Chief Editor

यशवंत ‘मधील डॉ.मीरा फड यांची आयआयपीएच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

Chief Editor

शांती ब्रह्म स्वरूप: जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज

Chief Editor

फार्मा शिक्षक क्रिकेट स्पर्धेत स्वामी विवेकानंद फार्मसीचा संघ विजेता

Chief Editor

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनास उत्स्फूर्त सुरुवात

Chief Editor

Leave a Comment