एम सी आर

मांडवीत बालमित्र मेळावा संमेलन उत्साहात; 23 वर्षांनंतर मित्रांची भावनिक भेट

Uncategorized

किनवट तालुका प्रतिनिधी –

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मांडवी येथे जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये बालमित्र मेळावा संमेलन उत्साहात पार पडले. तब्बल 23 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांच्या चेहऱ्यावर आनंद आणि भावनिक क्षणांचे चित्र पाहायला मिळाले.

या अनोख्या मेळाव्याचे आयोजन रवींद्र जंगलेवाड, बादल राठोड, लकी राठोड आणि अंकुश राठोड यांनी पुढाकार घेऊन केले. 2003 सालच्या दहावीच्या जुन्या बॅचमधील मित्रांना पुन्हा एकत्र आणण्याचा हेतू या कार्यक्रमामागे होता. अनेक वर्षांनंतर भेट झाल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि वातावरण आनंदमय झाले.

कार्यक्रमादरम्यान दिलीप श्रीनिवार यांनी “आने से उसकी आये बहार” हे गाणे सादर करून उपस्थितांचे मन जिंकले व कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र जंगलेवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन चव्हाण यांनी केले.

मांडवी नगरीत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या बालमित्र मेळाव्याचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत असून, आयोजकांच्या प्रयत्नांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Share

Related posts

नांदेडमध्ये अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; ५.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Chief Editor

आदर्श उपक्रम: सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा** *विविध ठिकाणी वृक्षारोपण; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप

Chief Editor

लोकप्रशासनाच्या क्षेत्रात संशोधन, प्रशिक्षण व प्रशासकीय सुधारणेला नवी दिशा

Chief Editor

नीट पेपरफुटी प्रकरणाचा परिणाम; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा

Chief Editor

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणींना वैमानिक होण्यासाठी “गिविंग विंग्स टू फ्लाई “उपक्रम.

Chief Editor

बोधिसत्त्व नगर वाडी बुद्रुक येथे माता रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने अजय वसंतराव गव्हाणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Chief Editor

Leave a Comment