एम सी आर
Uncategorized

परभणी-पुणे ट्रॅव्हल्सची दुचाकीला भीषण धडक; मानवतचे ४ तरुण जागीच ठार, राहुल जिनिंगसमोरील घटना

प्रतिनिधी /अनिल चव्हाण.

परभणीकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सने समोरील दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत दुचाकीवरील चार जण जागीच ठार झाले. हा थरारक अपघात २९ मे रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास येथील राहुल जिनिंग समोर घडला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, मृतांपैकी एकाची ओळख पटवणे सुरुवातीला अत्यंत कठीण झाले होते.
​मृतांची नावे:
​अपघातातील सर्व मृत हे मानवत येथील रहिवासी असून त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. शुभम आप्पाराव दहे (वय ३० वर्षे)
२. विष्णू गोरे (वय २८ वर्षे)
३. प्रल्हाद अशोकराव कुटे (वय २९ वर्षे)
४. नवनाथ शामराव जाधव (वय ३८ वर्षे)

​मिळालेल्या माहितीनुसार, ‘एन एल ०१ बी १३७४’ क्रमांकाची ट्रॅव्हल्स परभणीहून पुण्याकडे जात होती. दरम्यान, राहुल जिनिंग समोर समोरून येणाऱ्या ‘एम एच २२ बी बी ४७२४’ क्रमांकाच्या दुचाकीला ट्रॅव्हल्सची समोरासमोर जोरदार धडक बसली.
​अपघाताचे वृत्त समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) संदीप बोरकर, पोलीस उपनिरीक्षक (पोउनि) किशन पतंगे, प्रमोद देवकते आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातातील जखमी व मृतांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत वाहतूक पूर्ववत सुरळीत केली.


​अपघातानंतर पोलिसांनी सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयाच्या आवारात मृतांच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. एकाच गावातील चार जणांचा अशा अपघातात मृत्यू झाल्याने मानवत शहरासह परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडत असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले जाणार आहेत.

***

Share

Related posts

दिनांक 07 जानेवारी 2026 रोजी बी.सी.ए. विभागाकडून Data Science व AI या विषयावर एक दिवसीय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये सेवानिवृत्त हिंदी विभागप्रमुख डॉ.अनीता दिगंबरसिंह रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Chief Editor

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी शहीदी समागम पार्श्वभूमीवर २४ जानेवारी रोजी नांदेड तालुक्यातील सर्व शाळांना सुट्ट

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात ४ सप्टेंबर रोजी ‘संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास’ कार्यशाळेचे आयोजन

Chief Editor

यशवंत बिब्लियोफाइल्स : वाचन संस्कृती जपणारा अतिशय स्तुत्य उपक्रम:

Chief Editor

पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती आवश्यक – डॉ. गीता लाठकर

Chief Editor

Leave a Comment