एम सी आर
Uncategorized

नितीन गायकवाड यांची अमरावती विभागीय उपाध्यक्षपदी नियुक्ती

नितीन गायकवाड यांची अमरावती विभागीय उपाध्यक्षपदी नियुक्ती

नांदेड : स्वाभिमानी शिक्षक व शिक्षकेतर संघटना, नाशिक (महाराष्ट्र राज्य) यांच्या अमरावती विभागातील संघटनात्मक विस्ताराच्या पार्श्वभूमीवर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये श्री. नितीन निवृत्ती गायकवाड यांची अमरावती विभागीय उपाध्यक्ष तर श्री. बालाजी दत्तात्रय कुमरे यांची किनवट प्रकल्पाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत पटेल आप्पासाहेब, कार्याध्यक्ष लोकेश पाटील, विभागीय अध्यक्ष राजू रोहनकर आणि विभागीय कार्याध्यक्ष संदीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व मान्यतेने या नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी पुसद प्रकल्पाध्यक्ष श्री. लोमटे आणि पांढरकवडा प्रकल्पाध्यक्ष श्री. काजी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी शासन दरबारी प्रभावी पाठपुरावा करत संघटना अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. या नियुक्त्यांचे अमरावती विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून स्वागत होत असून नितीन गायकवाड व बालाजी कुमरे यांच्यावर अभिनंदन करण्यात येत आहे.

Share

Related posts

श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांना ‘यशवंत ‘ मध्ये विनम्र अभिवादन

Chief Editor

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींची यशोगाथा; पोलिस भरतीत दोन विद्यार्थिनींची निवड

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये स्वा.रा.ती.म. विद्यापीठ उन्हाळी परीक्षा सुरळीत

Chief Editor

डॉ. शंकररावजी चव्हाण : आध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा समन्वय साधणारे द्रष्टे लोकनेते

Chief Editor

पद्मश्री डॉ.स्मिता रवींद्र कोल्हे यांना कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते सोमवार ,९ मार्च रोजी प्रदान केला जाणार.

Chief Editor

Leave a Comment