एम सी आर

यशवंत ‘ मध्ये पर्यावरणशास्त्र विभागातर्फे इंडक्शन प्रोग्राम उत्साहात संपन्न

Uncategorized

नांदेड :(दि. १२ ऑगस्ट २०२६)
यशवंत महाविद्यालयातील पर्यावरणशास्त्र विभागाच्या वतीने माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांना पर्यावरणशास्त्र विषयाची ओळख, त्याचे महत्त्व, अभ्यासाच्या संधी तसेच पर्यावरण संवर्धनातील विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत मार्गदर्शन मिळावे, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. बतूला बालाजीराव यांनी केले. त्यांनी पर्यावरणशास्त्र विभागाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे सांगितले.
कार्यक्रमासाठी डॉ. राजकुमार पवळे, विभागप्रमुख, पर्यावरणशास्त्र विभाग, इंदिरा गांधी सीनियर कॉलेज, सिडको, नांदेड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण शास्त्राचे वाढते महत्त्व, पर्यावरणीय समस्या, शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी युवकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयाकडे केवळ अभ्यासाचा विषय म्हणून न पाहता सामाजिक जबाबदारीच्या दृष्टिकोनातून पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ‘एन्व्हायरो क्लब’चे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे, वृक्षसंवर्धन, स्वच्छता, जलसंवर्धन, जैवविविधता संरक्षण, प्लास्टिकमुक्त परिसर आणि विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे यासाठी एन्व्हायरो क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत.
प्रा. अरविंद शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सतीश इंजेवाड, प्रा. तोफिक शेख व दुग्धशास्त्र विभागाचे प्रा. बाळासाहेब लांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.कांचन पांचाळ यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विभागातील प्रयोगशाळा परिचर अभिनंदन कदम यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणशास्त्र विषयाची व्यापकता, त्यातील करिअरच्या संधी आणि पर्यावरण संवर्धनातील स्वतःची भूमिका यांची प्रेरणादायी ओळख झाली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीपणे संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.

Share

Related posts

नेसुबो महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

Chief Editor

विचारांची आणि मनाची स्वातंत्रता हीच खरी लोकशाही- प्रा डॉ सुधीर गव्हाणे

Chief Editor

प्रतिक्षा बिरादार हिची विद्यार्थी कल्याण मंडळाच्या सचिव पदी निवड

Chief Editor

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका; बहादरपुरा येथील जुना पूल बंद, नवीन पुलाचे काम ठप्प!

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १०० वृक्षांचे रोपण

Chief Editor

यशवंत ‘ येथील प्रा. शितल सावंत यांना पीएच.डी. प्राप्त

Chief Editor

Leave a Comment