एम सी आर

प्रतिक्षा बिरादार हिची विद्यार्थी कल्याण मंडळाच्या सचिव पदी निवड

Uncategorized

.–
उदगीर :- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयात शै.वर्ष 2025- 26 साठी विद्यार्थी कल्याण मंडळाच्या सचिव पदासाठी नुकतीच निवडणुक घेण्यात आली. ही निवडणुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या निवड समितीचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे यांच्या उपस्थित घेण्यात आली असून या निवडणुकीत बी.एसी.(कॉम्प्युटर सायन्स) द्वितीय वर्षात शिकणारी कु.प्रतिक्षा मधुकर बिरादार हिची बहुमताने निवड करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शेषनारायण जाधव यांची विशेष उपस्थिती होती.
सदरील निवडणुकीत विद्यार्थी कल्याण मंडळाच्या सचिव पदासाठी प्रतिक्षा बिरादार बी.एसी.(कॉम्प्युटर सायन्स, द्वितीय वर्ष) ऋतुजा आपटे बीसीए (कॉम्प्युटर सायन्स, तृतीय वर्ष) प्रिती जानके बी.एसी.(कॉम्प्युटर सायन्स, तृतीय वर्ष) हे तीन उमेदवार उभे होते. यावेळी तपासले सोनाली, हनमुजे नेहा, भाऊसागरे दिक्षा, जाधव ऋतुजा, घोणसे रितेश, टेंभारे दीप्ती, वलांडे पूजा, भद्रशेट्टे रेणुका, मोरे कृष्णा, पाटील अपूर्वा, सय्यद सलमा, कांबळे रामा, गायकवाड कोमल, बिरादार कार्तिक, प्रिन्सी बी, छत्रे महेश, धनुरे सचिन, मलहिप्परगेकर आदित्य, शेख मुस्थखिम, शरयू घोगरे या वर्ग प्रतिनिधी यांनी आपल्या मतदानाचा अधिकार वापरून प्रतिक्षा बिरादार हिची प्रचंड बहुमताने विजय केला.
या निवडी बद्दल संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी ज्योती स्वामी, संस्थेच्या एच.आर मॅनेजर स्नेहा लांडगे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अमर तांदळे, संगणक शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. राशिद दाईमी, प्रा.असिफ दाईमी,प्रा. नावेद मणियार, प्रा. वैष्णवी गुंडरे, प्रा.नम्रता कुलकर्णी, प्रा. रोहिणी वाघमारे, प्रा. अंजली रविकुमार, प्रा.सायमा पटेल, प्रा.सचिन तोगरिकर, प्रा.बालाजी सकनुरे, प्रा.अभिमन्यू भोसले,शीतल तोगरीकर, अमोल भाटकुळे, अपर्णा काळे, बायडी वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Share

Related posts

फोंडाघाट महाविद्यालयात वाणिज्य प्रश्नमंजुषा उत्साहात संपन्न.

Chief Editor

पीएच.डी. कोर्सवर्क ऑक्टोबर २०२६ परीक्षेसाठी अर्ज भरण्याचे आवाहन

Chief Editor

यशवंत ‘ मधील एनसीसी कॅडेट अक्षय बागल यांची सीआयएसएफ मध्ये निवड

Chief Editor

आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण यशवंतराव चव्हाण यांनी केली -प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे

Chief Editor

उपवर्गीकरणाचा तिढा सोडवण्यासाठी ऍड. बाळासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा – सुरेशदादा गायकवाड

Chief Editor

यशवंत युवक महोत्सवात पोस्टर सादरीकरण उत्साहात संपन्न

Chief Editor

Leave a Comment