ताज्या घडामोडी

अर्धापूरात मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र सैनिकाच्या स्मरणात स्वातंत्र सैनिक अमृत बागेची निर्मिती

*

अर्धापूर दि.१९ ता.प्र.

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथील भूगोल विभाग व एल.आय.सी. नांदेडच्यावतीने मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र सैनिकाच्या स्मरणात स्वातंत्र सैनिक अमृत बाग निर्मिती करण्यात आली आहे. याप्रसंगी हुतात्मांना अभिवादन करून मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र सैनिक केशवराव रामराव कुलकर्णी यांचे वारस सौ.अल्का केशवराव कुलकर्णी यांच्या हस्ते वडाच्या झाडाचे पूजन करून वृक्षरोपण करण्यात आले. स्वातंत्र सैनिक अमृत बाग निर्मिती कार्यक्रम १६ व १७ सप्टेंबर या दोन दिवशी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र.प्राचार्य डॉ. जे.सी. पठाण हे होते तर प्रमुख पाहुणे सौ.अल्का केशवराव कुलकर्णी , पत्रकार तथा मा.सु.मा. कुलकर्णी, भारतीय जीवन विमा निगमचे गांधीनगर शाखेचे चीफ मॅनेजर मा. एस.एल.पोपुलवार, वजीराबाद शाखेचे चीफ मॅनेजर मा. देवराव फलके, उपशाखा अधिकारी मा. पंडित लोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सौ.अल्का कुलकर्णी आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या की हे स्वातंत्र्य अतिशय संघर्षातून मिळालेले आहे. या स्वातंत्र्यामुळे आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे. हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना व स्वातंत्र्य सैनिकांना सदैव स्मरणात ठेवण्यासाठी शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथे स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकाच्या स्मरणात स्वातंत्र सैनिक अमृत बाग निर्मिती केल्याबद्दल संस्थेचे, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. जे.सी. पठाण व प्रकल्प समन्वयक प्रा.डॉ. परमेश्र्वर पौळ यांचे अभिनंदन केले. स्वातंत्र्याच्या लढाईत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, श्री स्वामी रामानंद तीर्थ, श्री गोविंदभाई श्राफ, श्री डॉ. शंकरराव चव्हाण, हु.जयवंतराव पाटील, हु. गोविंद पानसरे, श्री केशवराव कुलकर्णी, दिंगबरराव बिंदू, श्री रविनारायण रेड्डी आदीसह अनेकांनी यात योगदान दिले आहे. मराठवाडा मुक्ती लढ्यातील हुतात्मे व स्वातंत्र सैनिकाच्या प्रेरणातून मराठवाड्यात सामाजिक व शैक्षणिक संस्थेमार्फत असेच कृतिशील उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमासाठी लाभलेले दुसरे प्रमुख पाहुणे मा. एस.एल.पोपुलवार यांनी कार्यक्रमात योगदान दिलेल्या सर्व लोकांचा सत्कार करून श्रमदान केलेल्या लोकांना प्रोत्साहन दिले. ते बोलताना म्हणाले की एल.आय.सी. नेहमीच समाज उपयोगी व पर्यावरण संवर्धनासाठी कामात योगदान देते. यावर्षीपण हजारो झाडाची लागवड करत आहे. यावर्षीच्या वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच शंकरराव चव्हाण महाविद्यालयातील स्वातंत्र सैनिक अमृत बाग निर्मितीत एल.आय.सी.नांदेडला सहभागी करून केल्याबद्दल महाविद्यालयाचे त्यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र.प्राचार्य डॉ.जे.सी. पठाण यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा कार्यक्रम घेतल्याबद्दलया कार्यक्रमाचे आयोजक भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ. सोमनाथ बिराजदार व प्रा.डॉ. परमेश्र्वर पौळ यांचे अभिनंदन केले. बोलतांना ते म्हणाले की मराठवाडा स्वातंत्र्याचा लढा हा कोणत्या जाती व धर्माविरुद्ध नसून तो जुलमी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात स्वातंत्र्यासाठी दिलेला सर्व जाती धर्माने दिलेला लढा होता. यात सर्व जाती-धर्माच्या लोकांनी योगदान दिले होते. या लढ्यात अनेक हुतात्म्यानी व स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची परवा न करता हे स्वातंत्र्य मिळवून दिले आहे तरी आपण सर्व जाती-धर्मांनी सलोख्याने गुणा गोविंदाने राहून समाजामध्ये शांतता प्रस्थापित करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, ते कर्तव्य आपण प्रामाणिक पार पाडूया असे म्हणत अध्यक्ष समारोप केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समिती सदस्य प्रा.डॉ.एस.पी.औरदकर, प्रा.डॉ.एम.के.काजी, प्रा.डॉ. विनोद शिंदे, प्रा.डॉ.के.के.कदम, प्रा.डॉ. बालाजी आव्हाड, प्रा.आदित्य भांगे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी एल.आय.सी.चे. विकास अधिकारी मा.बालाजी कदम, मा. जयेश माजलगावकर,मा. सुधाकर अडकिने, मा.जी.एस. कासट, मा. दूध दूधंबे, मा. कैलास हराळ,मा.संतोष कोमलवार,मा. अश्विनी सोनसळे,मा. मनप्रीत कौर, व शंकरराव चव्हाण महाविद्यालयातील ग्रंथपाल डॉ.मधुकर बोरसे, प्रा.डॉ.विक्रम कुंटूरवार, प्रा.डॉ.विलास चव्हाण, डॉ. दिनानाथ बिच्चेवार, डॉ.निळकंठ लांडे, डॉ.मंगेश पोतंगले, प्रा.राम रजेगोरे, प्रा.माधव टेंभुर्णे, श्री अरविंद जामगे, श्री सखाराम शिंदे, श्री राजाराम बुरकुले, श्री बालाजी पंदिलवाड, श्री सदाशिव सिनगारे, श्री बालाजी कवठेकर ,विमा प्रतिनिधी , एल.आय.सी. कर्मचारी व महाविद्यालयाचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.डॉ. परमेश्र्वर पौळ , सूत्रसंचालन प्रा.डॉ.के.के.कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. सोमनाथ बिराजदार यांनी मानले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.