यशवंत महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा तिरंगा रॅलीत उस्फूर्त सहभाग
नांदेड:
श्री शारदा भवन शिक्षण संस्था संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड मधील राष्ट्रीय सेवा योजना वरिष्ठ व कनिष्ठ विभाग यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष या निमित्ताने तिरंगा परिवार यांनी आयोजित केलेल्या रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला महाविद्यालयाचे 75 राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक या रॅलीमध्ये सहभागी झाले . सकाळी सात वाजता महावीर चौक वजीराबाद येथून रॅली सुरुवात झाली ही रॅली विसावा गार्डन या ठिकाणी विसर्जित करण्यात आली या ठिकाणी राष्ट्रगीत हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली .
या रॅलीचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग वरिष्ठ व कनिष्ठ यांनी केले होते राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ बी आर भोसले डॉ मीरा फड दिगंबर भोसले कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी अभिनंदन इंगोले डॉ हुलसुरे डॉ गायकवाड यांनी या रॅलीचे यशस्वी आयोजन केले .