यशवंत मध्ये मानसिक आरोग्य जनजागृती मोहिमेंतर्गत व्याख्यान संपन्न


नांदेड:( दि.२१ सप्टेंबर २०२३)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग, वैद्यकीय सहाय्यता कक्ष, महिला सुरक्षा व सुधार समिती आणि श्री गुरु गोविंद सिंहजी मेमोरियल शासकीय रुग्णालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मानसिक आरोग्य जनजागृती मोहीम अंतर्गत व्याख्यान उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, प्रमुख वक्ते मनोविकार तज्ञ डॉ. शाहू शिराढोणकर आणि समाजसेविका सौ. जयश्री गोरडवार या होत्या.
याप्रसंगी प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संजय ननवरे, डॉ.धनराज भुरे, डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ.राजकुमार सोनवणे, डॉ.मंगल कदम, डॉ.नीताराणी जयस्वाल, डॉ.बी.बालाजीराव, डॉ.दीप्ती तोटावार, प्रा.नारायण गव्हाणे, प्रा.साहेबराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
या व्याख्यानाचे सूत्रसंचालन डॉ.धनराज भुरे यांनी केले. प्रारंभी प्रास्ताविक डॉ.संजय ननवरे यांनी मांडले, आणि शेवटी आभार डॉ.मंगल कदम यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती होती.