यशवंत महाविद्यालयात मेरी माटी मेरा देश अमृत कलश उपक्रमाचे आयोजन


नांदेड:(दि.२१ सप्टेंबर २०२३)
श्री शारदा भवन शिक्षण संस्था संचलित यशवंत महाविद्यालय,नांदेड येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मेरी माटी मेरा देश या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले.
सेल्फी विथ माटी, माटी को नमन वीरो को वंदन, अमृत वाटिका अशा अनेक उपक्रमांचे आयोजन या अंतर्गत करण्यात आले. ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या हस्ते मुठभर माती अमृत कलशात अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सेल्फी विथ माटी या उपक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी अमृत कलशात माती टाकून यासोबत काढलेली सेल्फी दिलेल्या लिंकमध्ये अपलोड केली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे तथा डॉ.कविता सोनकांबळे,महाविद्यालयाचे प्रबंधक श्री.संदीप पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. कबीर रबडे याप्रसंगी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.बी.आर. भोसले, डॉ.मीरा फड, डॉ.दिगंबर भोसले, कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.अभिनंदन इंगोले, डॉ.हुलसुरे, डॉ.गायकवाड हेही यावेळी उपस्थित होते.
महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आणि उपस्थित विद्यार्थ्यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.