नांदेड – लोहा तालुक्यातील डेरला गावातील गजानन काळे यांच्या गट क्रमांक 204 शिवारातील संपूर्ण चार एकरातील ऊस शार्टसकिट होऊन तारा उसावर पडल्याने जवळपास 350 टन ऊस जळून खाक झाला असून या प्रकरणी फिर्यादी वरीष्ठ तंत्रज्ञ विघुत वितरण कंपनीचे विशाल डाकोरे यांनी सोनखेड पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात जळीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शिवाजी डाकोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माझ्याकडे जाणापुरी, खरबी, डेरला, या गावाचे कामकाज पाहतो.काल दि. 03 सप्टेंबर 26 रोजी सहाय्यक अभियंता गव्हाणे यांनी मला कात्रे, चिंतारे यांना सांगितले होते की, दि. 04 सप्टेंबर 26 रोजी झरी व डेरला येथे महसुलची टिम उपसा सिंचन च्या ठिकाणचा विद्युत पुरवठा बंद करण्यासाठी येणार आहे तुम्ही त्या ठिकाणी जावून ते सांगतील त्या त्याप्रमाणे विद्युत पुरवठा बंद करा असे सांगितले होते. त्याचे आदेशाने आज दि. 04.सप्टेबर 26 रोजी मी व माझे सहकारी चिंतारे, कात्रे असे दुपारी अंदाजे 12.30 वा सुमारास डेरला तलावा जवळ महसुलच्या टिमला भेटलो. व त्यातील अधिकारी मंडळ अधिकारी सचिन नरवाडे, तलाठी ढेपे मॅडम, ग्रामसेवक रुपाली मोरे, नायब तहसिलदार मोकले यांनी आम्हाला आदेश दिला की, उपसा सिंचन वर जाणारा विद्युत पुरवठा बंद करा असे सांगीतल्याने वेळ अंदाजे दुपारी 2.वा सुमारास मी आणि माझे सहकारी गजानन गोविंदराव काळे याच्या डेरला शिवारातील नागझरी डीपी चा सिंचन तलावाकडे जाणारा विद्युत पुरवठा डीपी वरून कट करून बंद केला व केवळ तसेच सोडलेल्या वेळ अंदाजे 3 वा सुमारास जानापुरी येथून विद्युत पुरवठा सुरू केलो. तोच मला डेरला गावातुन फोन आला की, नागझरी डीपी येथून लाईटचा स्पार्क होवून गजानन काळे याचा ऊस जळत आहे. तुम्ही लवकर या असे सांगीतल्याने मी ताबडतोब सदर डीपी जवळ आलो व पाहणी केली असताना डीपी जवळील गजानन गोविंदराव काळे याचे शेत गट क्र 204 डेरला शिवार मधील संपूर्ण ऊसाचे पिक जळून शेतकऱ्याचे नुकसान होत होते. अंदाजे 3 ते 4 एकर ऊस जळाला आहे.
सोनखेड पोलीस स्टेशन येथे अकस्मात जळीत नोंद क्र 8/26 दाखल करून पोलीस हे.कॉ. हंबर्डे यांच्याकडे दिला असून शेतकरी गजानन काळे यांच्या शेतातील जवळपास चार एकर मधील 350 ऊस शार्टसकिट मुळे जळुन खाक झाला आहे.
