एम सी आर

पश्चिम विभागीय खो-खो स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विजयी*

Uncategorized

नांदेड:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे आयोजित पश्चिम विभागीय खो-खो (मुले) स्पर्धेचा दि. ६ एप्रिल २०२६ रोजी उत्साहात समारोप झाला. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ द्वितीय, यजमान विद्यापीठ तृतीय तर मुंबई विद्यापीठाने चतुर्थ क्रमांक मिळविला. स्पर्धेत एकूण ५८ संघांचा सहभाग होता.
स्पर्धेच्या समारोपप्रसंगी बक्षीस वितरण सोहळा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, बाबा कुलदीपसिंग महाराज, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव डॉ. चंद्रजीत जाधव तसेच विभागीय सहसंचालक डॉ. बाबासाहेब भोसले, एआययूचे स्पर्धा निरीक्षक डॉ.जगदीश गस्थी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, नारायण चौधरी, कुलसचिव डॉ.ज्ञानेश्वर पवार, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर डॉ. पराग खडके, अधीसभा सदस्य युवराज पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, स्पर्धा समन्वयक डॉ.पवन पाटील आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ भास्कर माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
विजेत्या, उपविजेत्या तसेच तृतीय आणि चौथा क्रमांकाच्या संघांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी तसेच पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करत पुढील वाटचालीस मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अधिसभा सदस्य डॉ.महेश बेंबडे, डॉ.महेश वाखरडकर, डॉ. माधव कदम, डॉ. अशोक चाटसे, डॉ.शिवानंद पाटील, डॉ. गणेश मनगिरे, क्रीडा विभागातील संजयसिंह ठाकुर, रामा किरकन, शिवाजी हंबर्डे, सुनील लुटे, रतनसिंग पुजारी अथक परिश्रम घेतले. या स्पर्धेसाठी पंचप्रमुख प्रशांत पाटणकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे स्पर्धा निरीक्षक संदीप तावडे, संतोष सावंत, प्रभाकर काळे, दीपक सपकाळ, रणजीत जाधव, अंकुश चव्हाण, सचिन तहानिक, अमोल मुरकुळे, सुजित माळी आदींनी पंच म्हणून जबाबदारी पार पडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. भीमा केंगले यांनी केले. शिस्तबद्ध नियोजन आणि उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे स्पर्धा सुरळीत पार पडली. या स्पर्धेमुळे खो-खो क्रीडेचा रोमांच अनुभवायला मिळाला असून मराठवाड्याच्या क्रीडा परंपरेला नवे बळ मिळाल्याचे मत क्रीडाप्रेमींनी व्यक्त केले.
————————————-

Share

Related posts

स्वारातीम’ विद्यापीठात तीन कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

Chief Editor

श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांना ‘यशवंत ‘ मध्ये विनम्र अभिवादन

Chief Editor

कै सौ कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी येथे दिनांक 9 ते 12 मार्च 2026 दरम्यान “कमलोत्सव 2026

Chief Editor

प्रो. राजाराम माने यांच्या संशोधन टीमच्या ‘विषारी वायू शोधक’ उपकरणाला केंद्र सरकारचे पेटंट

Chief Editor

पत्रकारांसाठीच्या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे कुलगुरूंचे आवाहन

Chief Editor

आकाशा गावकवाड मृत्यू प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला १ कोटींची मदत देण्याची मागणी

Chief Editor

Leave a Comment