एम सी आर
Uncategorized

आकाशा गावकवाड मृत्यू प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला १ कोटींची मदत देण्याची मागणी

नांदेड : आकाशा मुंजाजी गावकवाड यांच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून पीडित कुटुंबाला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना (एबीएस फोर्स) महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, आकाशा मुंजाजी गावकवाड (वय २५) ही उच्च शिक्षण घेणारी विद्यार्थिनी होती. ती आपल्या कुटुंबासह राहत होती. मात्र काही दिवसांपूर्वी तिचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या घटनेमुळे गावकवाड कुटुंबावर मोठे दु:ख कोसळले असून त्यांना मानसिक व आर्थिक धक्का बसला आहे. त्यामुळे शासनाने पीडित कुटुंबाला तात्काळ एक कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सदर निवेदनावर जिव्हाध्यक्ष पंडित वाघमारे, एन .जी .पोतरे , जिव्हा उपाध्यक्ष शिवाजी बोयणर, रमेश सुर्यवंशी , जिव्हाध्यक्षा सुकमलाताई वाघमारे , भुजंग गायकवाड़ , मल्हारी गायकवाड, जयसिंग कांबळे,अक्षय बोयाळ , ज्ञानेश्वर गायकवाड़ , मुंजाजी मुळेकर , खानजोडे ताई, सुभाष वाघमारे , उतम जाधव , बालाजी दुदगोंडे कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Share

Related posts

राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपण

Chief Editor

सामाजिक चळवळी जातीवर नव्हे महापुरुषांच्या विचारावर मोठया होतात.: सचिन साठे

Chief Editor

जिल्हा युवा पुरस्कारासाठी 22 एप्रिलपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

Chief Editor

महावितरण चा सावळा गोंधळ; स्मार्ट मीटर व सोलार रीडिंगमध्ये तफावत, नांदेडमध्ये अचानक वीज तोडणी

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Chief Editor

नांदेड पोलीसांची धडक कारवाई : ८४ ‘फटाका सायलेंसर’ जप्त, रोड रोलरने नष्ट

Chief Editor

Leave a Comment