एम सी आर
Uncategorized

कै सौ कमलताई जामकर महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती व सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रमाचे आयोजन 

कै सौ कमलताई जामकर महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती व सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रमाचे आयोजन 

परभणी: प्रतिनिधी

कै सौ कमलताई जामकर महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे दि. 8 ते 14 एप्रिल 2026 दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले होते. या अंतर्गत दि. 8 एप्रिल 26 रोजी महामानवाचा जीवन घटनाक्रम फलकाचे अनावरण प्राचार्य डॉ रामचंद्र भिसे यांच्या वतीने प्रा. अरुण पडघन, डॉ संगीता आवचार तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ रवींद्र इंगळे यांचे हस्ते करण्यात आले. प्रसंगी डॉ अभिजीत सरनाईक, डॉ महेश जाधव यांचेसह इतर सहकारी उपस्थित होते. दि. 9 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगेबाबा यांचे विचार व कार्य या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये बहुसंख्य विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक राधा कन्हे, द्वितीय क्रमांक ऐश्वर्या रोडे व तृतीय क्रमांक कोमल जाधव या स्पर्धकांनी प्राप्त केला.

बक्षिसपात्र व सर्व सहभागी विद्यार्थिनींचे मा प्राचार्य डॉ रामचंद्र भिसे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ रवींद्र इंगळे तथा सर्व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.

सांस्कृतिक विभागातर्फे महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त व्याख्यानाचेआयोजन दि.११ एप्रिल 2026 रोजी आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ रामचंद्र भिसे व प्रमुख अतिथी म्हणून डॉ महेश जाधव, इतिहास विभाग प्रमुख यांना आमंत्रित केले होते.

प्रसंगी डॉ महेश जाधव यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्य या विषयावर व्याख्यान दिले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ रामचंद्र भिसे यांनी अशा कार्यक्रमांचे आयोजन करुन थोर व्यक्तींच्या कार्यास उजाळा मिळतो असे मत व्यक्त केले तसेच सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ रवींद्र इंगळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी सर्व सहकाऱ्यांची उपस्थिती लाभली.

दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य या विषयावर प्रा माधुरी देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्ष व प्रमुख अतिथी तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. डॉ आंबेडकरांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्या विषयी विस्तृत मांडणी या प्रसंगी प्रा माधुरी देशमुख यांनी केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा प्राचार्य डॉ रामचंद्र भिसे यांची उपस्थिती लाभली होती. अध्यक्षीय समारोप प्रसंगी मा प्राचार्य डॉ रामचंद्र भिसे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्य या विषयी मार्गदर्शन करून जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन केल्याबद्दल सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन केले. प्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ रवींद्र इंगळे यांच्या सह सर्व सहकारी प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.

Share

Related posts

आदर्श उपक्रम: सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा** *विविध ठिकाणी वृक्षारोपण; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप

Chief Editor

फार्मा शिक्षक क्रिकेट स्पर्धेत स्वामी विवेकानंद फार्मसीचा संघ विजेता

Chief Editor

विकास, गुंतवणूक व रोजगार निर्मितीला चालना देणारा अर्थसंकल्प: आरिफ खान

Chief Editor

भक्ती आणि शक्ती हे आयुष्य जिंकण्याचे सूत्र – संजय भोसले

Chief Editor

भगवान रजनीश कम्यूनमध्ये सक्रिय ध्यान अभियानास उत्साहात प्रारंभ

Chief Editor

यशवंत ‘मध्ये दुग्धशास्त्र विभागाचा इंडक्शन प्रोग्राम संपन्न

Chief Editor

Leave a Comment