एम सी आर

महिला दिना निमित्त राज्य महिला आयोगच्या अध्यक्ष माननीय रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते भित्तिपत्रका चे विमोचन

Uncategorized

नांदेड:
दिनांक 9मार्च रोजी कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात राज्य महिला आयोगच्या अध्यक्ष माननीय रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ता ने महाविद्यालयातील बी.ए. प्रथम वर्षाच्या कु. रुपाली जाधव व कु. शुभांगी सरकटे यांनी 2026 या वर्षी ची जागतिक महिला दिनाची थीम ” Give to Gain” या विषयावर भितीपत्रक तयार केले होते.या भितीपत्रकाचे विमोचन केले. या प्रसंगी उपस्थित असलेले नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.हेमंतराव जामकर, सचिव मा. श्री. विजयराव जामकर, अँड.मा.बाळासाहेब जामकर,संस्थचे संचालक मा.मंगेशराव सुभेदार तसेच महाविद्यालया चे प्राचार्य डॉ.रामचंद्र भिसे यांनी विद्यार्थीनींचे कौतुक केले. हे भित्तपत्रक लेखन करण्या करीता महाविद्यालयात कार्यरत असलेल्या “राजमाता जिजाऊ ” स्त्री अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. संगीता लोमटे यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले.

Share

Related posts

यशवंत ‘ मध्ये पर्यावरण संवर्धन, झिरो प्लास्टिक, ग्रीन कॅम्पस मिशनसाठी कृतिशील उपक्रम

Chief Editor

तरुणांनी पुस्तकांच्या अधिक जवळ गेले पाहिजे : ना. हेमंत पाटील

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात १९ जून रोजी ‘राष्ट्रीय वाचन दिन’ आणि विद्वत व्याख्यानाचे आयोजन

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहपूर्वक संपन्न*

Chief Editor

डॉ. अरुण बळीराम पडघन यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न

Chief Editor

नेसुबो महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

Chief Editor

Leave a Comment