एम सी आर

स्वारातीम विद्यापीठात १९ जून रोजी ‘राष्ट्रीय वाचन दिन’ आणि विद्वत व्याख्यानाचे आयोजन

Uncategorized

ज्ञान स्रोत केंद्रात ‘वाचन संस्कृतीची बदलती रूपे’ या विषयावर होणार मंथन

कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांचे अध्यक्षीय प्रबोधन; डॉ. महेश जोशी यांचे मुख्य व्याख्यान

नांदेड: प्रतिनिधी
भारतातील ग्रंथालय चळवळीचे जनक पी. एन. पणीकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ‘ज्ञान स्रोत केंद्रा’त शुक्रवार, दिनांक १९ जून, २०२६ रोजी ‘राष्ट्रीय वाचन दिन’ समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने ग्रंथ, ग्रंथालये व वाचन प्रेमींसाठी एका विशेष विद्वत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान संपन्न होणार असून, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याप्रसंगी अभ्यासक व व्याख्याते डॉ. महेश जोशी हे ‘वाचन संस्कृतीची बदलती रूपे’ या अत्यंत महत्वपूर्ण व समकालीन विषयावर व्याख्यान पुष्प गुंफणार आहेत. बदलत्या डिजिटल युगात वाचनाचे स्वरूप आणि त्याचे महत्त्व यावर ते प्रकाश टाकतील. हा कार्यक्रम शुक्रवार, दि.१९ जून, २०२६ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता विद्यापीठाच्या ‘ज्ञान स्रोत केंद्र’ (मध्यवर्ती ग्रंथालय) येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सन्माननीय सदस्य, संवैधानिक अधिकारी, संकुलांचे संचालक यांची उपस्थिती लाभणार आहे. हे व्याख्यान सर्वांसाठी खुले असून विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक, ग्रंथपाल, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, संशोधक विद्यार्थी, परिसरातील नागरिक आणि ग्रंथप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर डी. पवार आणि ज्ञान स्रोत केंद्राचे प्र. संचालक डॉ. जगदीश एन. कुलकर्णी यांनी केले आहे.
———————–

Share

Related posts

पद्मश्री डॉ.स्मिता रविंद्र कोल्हे यांना सन २०२४- २५ या वर्षीचा कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार जाहीर.

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये एनसीसी प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Chief Editor

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका; बहादरपुरा येथील जुना पूल बंद, नवीन पुलाचे काम ठप्प!

Chief Editor

यशवंत ‘मधील प्रा. ओमप्रकाश गुंजकर चार सुवर्णपदकांचे मानकरी‌

Chief Editor

श्री चक्रधर स्वामी हे मानवतेचे प्रेरणास्त्रोत -प्राचार्य डॉ.मा.मा.जाधव

Chief Editor

सेंटर झोन बॉक्सिंग व तायक्वांदो स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाचा दबदबा

Chief Editor

Leave a Comment