एम सी आर
Uncategorized

यशवंत ‘मधील प्रा. ओमप्रकाश गुंजकर चार सुवर्णपदकांचे मानकरी‌

नांदेड :(दि. २९ ऑगस्ट २०२६)

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील सुप्रसिद्ध जलतरणपटू समाजशास्त्राचे प्रा.ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर यांना श्री.मार्कंडेय जलतरण तलाव, सोलापूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय मास्टर्स वयोगट जलतरण स्पर्धा: २०२६ मध्ये चार सुवर्णपदके आणि एका रौप्य पदकाची प्राप्ती झाली आहे.

या सुयशाबद्दल माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी यथोचित सत्कार केला. याप्रसंगी त्यांच्या जलतरण नियमिततेची आणि कौशल्याची भरभरून स्तुती केली. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.नरेंद्र कंचटवार, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे यांची उपस्थिती होती.

तसेच उपप्राचार्य प्रा. वंदना बदने, डॉ.एल. व्ही. पदमाराणी राव, डॉ. माधव दुधाटे, डॉ.साहेब शिंदे, डॉ. कविता सोनकांबळे, डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ. मीरा फड, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ.विश्वाधार देशमुख, प्रा. श्रीकांत सोमठाणकर, प्रा.सचिन आपस्तंब, डॉ.एकनाथ मिरकुटे, डॉ. बी. जी. देशमुख, डॉ.मुकेश धर्मले, प्रा. उत्तम केंद्रे, संदीप पाटील, कालिदास बिरादार, गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, प्राचार्य श्रीरंग बोडके, प्रा.एस.डी.बोकारे, प्रा.एम. एस.कुलकर्णी, बालाजी गाडे, सेवानिवृत्त वनाधिकारी गोपाळराव गुंजकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक किशोर गुंजकर, श्रीकांत गुंजकर, खंडू देशमुख, राजेंद्र ताटे, राजेश्वर बोधकुर यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

Share

Related posts

जिजाऊंच्या संस्काराचा वसा आणि वारसा आजच्या मुलींनी घ्यावा : सुभाष ढगे

Chief Editor

नांदेड महानगरपालिका निवडणूक 2026 : प्रभाग क्र. 10 (अ) मधून ॲड. ज्ञानेश्वर धडके यांचा सर्वांगीण विकासाचा निर्धार

Chief Editor

राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक यश! डॉ. संदीप काळे यांचा गौरव संपन्न!

Chief Editor

फार्मा शिक्षक क्रिकेट स्पर्धेत स्वामी विवेकानंद फार्मसीचा संघ विजेता

Chief Editor

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चार चिमुकल्यांचा बळी; कुटुंबीयांना २० लाख मदत द्या — डॉ. मुजाहिद खान

Chief Editor

सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने पदभरती

Chief Editor

Leave a Comment