एम सी आर

यशवंत वार्षिक युवक महोत्सवात रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न

Uncategorized

नांदेड:(दि.४ मार्च २०२६)
यशवंत वार्षिक युवक महोत्सवात रांगोळी स्पर्धा दि.२७ फेब्रुवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे उपस्थित होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. बंडेवार, नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय, नांदेड यांनी भूमिका पार पाडली.
महोत्सवाचे समन्वयक डॉ. नीरज पांडे तसेच स्पर्धा समन्वयक डॉ. मंगल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला.
स्पर्धेसाठी एकूण ७१ स्पर्धकांनी नोंदणी केली होती. स्पर्धा फ्री हँड आणि ठिपक्यांची रांगोळी अशा दोन प्रकारांत घेण्यात आली. २२ स्पर्धकांनी आपल्या कल्पकतेचा आणि कलात्मकतेचा उत्कृष्ट नमुना सादर केला. रचना, सर्जनशीलता, स्वच्छता आणि विषयानुरूपता या निकषांवर परीक्षकांकडून मूल्यांकन करण्यात आले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ.पदमाराणी राव, डॉ.मीरा फड यांची उपस्थिती लाभली. समितीतील सदस्य डॉ. नीताराणी जैस्वाल डॉ. रत्नमाला म्हस्के, डॉ. स्वाती मदनवाड आणि एस.डी.मिरेवाड, पी. यू. राठोड, सौ. मनीषा बाचोटीकर, सौ. काकडे यांनी परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील आदींनी सहकार्य केले.

Share

Related posts

स्वारातीम विद्यापीठात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

Chief Editor

हिंद दी चादर कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी भाविकांना लंगर वाढून केली सेवा

Chief Editor

‘यशवंत ‘मधील डॉ.मीरा फड यांची आयआयपीएच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

Chief Editor

अतिक्रमणाविरोधात संयुक्त कारवाई; शिवाजीनगरसह इतर परिसरातील रस्ते व फुटपाथ मोकळे

Chief Editor

_विद्रोही साहित्य संमेलनात प्रख्यात सिने अभिनेते मिलिंद शिंदे यांची मुलाखत ठरली लक्षवेधी

Chief Editor

बहुव्यापी व बहुआयामी: डॉ. हरिश्चंद्र पतंगे (लेखक: डॉ.अजय गव्हाणे)

Chief Editor

Leave a Comment