नांदेड : प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ज्ञानतीर्थ युवक महोत्सवांतर्गत रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी नांदेड येथील सायन्स कॉलेज परिसरातील महात्मा फुले नगरीत विविध कलाप्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पाच विविध मंचांवर दिवसभर साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य आणि ललित कलांचे सादरीकरण होणार असून, विद्यार्थी कलाकारांना आपली कलात्मक प्रतिभा सादर करण्याची संधी मिळणार आहे.
**पाच मंचांवर विविध स्पर्धांचे आयोजन**
मंच क्रमांक १ वरील साने गुरुजी मंचावर सकाळी ९ वाजता जलसा, तर सायंकाळी ३ वाजता लोकनृत्य व आदिवासी नृत्य स्पर्धा होणार आहे.
मंच क्रमांक २ वरील नाना पाटेकर मंचावर सकाळी ९ वाजता शास्त्रीय नृत्य, दुपारी १२ वाजता नक्कल आणि सायंकाळी ६ वाजता एकांकिका स्पर्धा होणार आहे.
मंच क्रमांक ३ वरील डॉ. श्रीराम लागू मंचावर सकाळी ९ वाजता भारतीय समूह गायन, तर दुपारी ३ वाजता शास्त्रीय गायन स्पर्धा होणार आहे.
मंच क्रमांक ४ वरील पंकज उदास मंचावर सकाळी ९ वाजता वादविवाद, तर दुपारी १२ वाजता कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
मंच क्रमांक ५ वरील स्मिता पाटील मंचावर सकाळी ९ वाजता मृदमूर्तीकला, दुपारी १२ वाजता रांगोळी आणि सायंकाळी ३ वाजता कलात्मक जुळवणी अर्थात इन्स्टॉलेशन स्पर्धा होणार आहे.
या विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार असून, युवक महोत्सवातील सांस्कृतिक वातावरण अधिक उत्साही होण्याची अपेक्षा आहे. संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य आणि दृश्यकलेच्या माध्यमातून विद्यार्थी आपली सर्जनशीलता व कलात्मक कौशल्ये सादर करणार आहेत.
**स्थळ : महात्मा फुले नगरी, सायन्स कॉलेज, नांदेड.**
**दिनांक : रविवार, १८ ऑक्टोबर २०२६.**
