नांदेड:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व सायन्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२६’ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवास जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी साने गुरुजी मंचावरील कव्वालीचा प्रेक्षकांमध्ये बसून मनमुराद आस्वाद घेतला.
याप्रसंगी कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ. डी. एन. मोरे, प्राचार्य डॉ. एल. पी. शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, अधिसभा सदस्य युवराज पाटील, डॉ. प्रशांत सुतकर व डॉ. गणेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
