एम सी आर

सामाजिक माध्यमे आणि समाज’ पुस्तक प्रकाशित समाजशास्त्र विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ग्रंथ

Uncategorized

लातूर, प्रतिनिधी : समाजशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे “सामाजिक माध्यमे आणि समाज (Social Media and Society)” हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या ग्रंथाचे लेखक Dr. Rajabhau V. Navagankar असून ते तोषणिवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेनगाव (जि. हिंगोली) येथील समाजशास्त्र विभागप्रमुख आहेत. पुस्तकाचे प्रकाशन Prabhakar Publication यांनी केले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) नुसार बी.ए. द्वितीय वर्ष (तृतीय सत्र) अभ्यासक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या
या पुस्तकामध्ये आधुनिक प्रसारमाध्यमांची संकल्पना, सोशल मीडियाचा इतिहास, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर, सामाजिक परिवर्तनातील सोशल मीडियाची भूमिका तसेच सोशल मीडियाशी संबंधित कायदे व नियम यांचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000, आयटी नियम 2021 व डिजिटल डेटा संरक्षण कायदा 2023 यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचाही समावेश ग्रंथात करण्यात आला आहे.

लेखक डॉ. नवगणकर हे मागील 26 वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी “महाराष्ट्र मानव विकास मिशनचा मराठवाड्यातील सामाजिक व आर्थिक परिणाम : एक समाजशास्त्रीय अध्ययन” या विषयावर पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन निबंध सादर केले असून दोन संपादित व तीन क्रमिक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यांना “डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श शिक्षक पुरस्कार” प्राप्त झाला आहे. ते विविध शैक्षणिक व समाजशास्त्रीय संस्थांशी संलग्न असून समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासवृद्धीसाठी कार्यरत आहेत.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आलेला हा ग्रंथ समाजशास्त्राचे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच NET/SET परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी विशेष उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. सोशल मीडियाचा योग्य, जबाबदार व कायदेशीर वापर करण्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे.

Share

Related posts

स्वारातीम विद्यापीठात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा*

Chief Editor

बंजारा आणि शीख गुरूंचे नाते: व्यापार, श्रद्धा आणि शौर्याचा एक अपरिचित इतिहास

Chief Editor

महिलांचे राजकारणातील कर्तृत्व वाखाणण्यासारखे -डॉ.लक्ष्मी पूरणशेट्टीवार

Chief Editor

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मोठा निर्णय! लेफ्टनंट डॉ. किशोर इंगळे यांना मतदानाचा अधिकार बिनविरोध.

Chief Editor

कै सौ कमलताई जामकर महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती व सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रमाचे आयोजन 

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये सेल्फ ग्रुमिंग आणि मेक ओव्हर कोर्सचे उद्घाटन

Chief Editor

Leave a Comment