एम सी आर

बहुव्यापी व बहुआयामी: डॉ. हरिश्चंद्र पतंगे (लेखक: डॉ.अजय गव्हाणे)

Uncategorized
बहुव्यापी व बहुआयामी: डॉ. हरिश्चंद्र पतंगे
(लेखक: डॉ.अजय गव्हाणे)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता व यशवंत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे एक मनमोकळे, हसतमुख, मैत्री व सहकार्य भावनांचे मिश्रण असलेले अद्भुत व्यक्तिमत्व आहे.
सदैव क्रियाशीलता व कार्यमग्नता हा त्यांचा स्वभाव. मुख्य म्हणजे प्रशासन व अध्यापनाच्या कार्याबरोबरच त्यांनी अध्ययन अजूनही त्यागलेले नाही. नेहमी नवनवीन बाबी शिकत राहणे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित विविध पैलू शिकण्याबरोबरच त्यांचा शैक्षणिक, शिक्षणेतर व शिक्षणपूरक उपक्रमांमध्ये सदैव प्रयोगासाठी ते नेहमी सज्ज असतात. हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा २४ कॅरेट सोने असलेला खरा दागिना.
‘फळाची अपेक्षा न करता कर्म करीत राहणे’, या तत्त्वाचा पुरेपूर स्वीकार केलेले अध्यापक व प्रशासक. आपल्या सकारात्मक, विधायक व रचनात्मक कार्याचा व्यक्तिशः मला उपयोग काय? असा विचार न करणारी माणसं जवळपास विरळच होत आहेत. अशा विरळ व्यक्तिमत्वांपैकी हरिश्चंद्र पतंगे.
वाणिज्य हा त्यांचा विषय असूनही व्यापारीकरण, व्यावसायिकरण हा त्यांच्या स्वभावाचा भाग नाही. वाणिज्य व्यवस्थापनशास्त्रातील तज्ञ, अनुभवी व कुशल प्राध्यापक. विद्यापीठस्तरावर वाणिज्य शाखा म्हटले की, हरिश्चंद्र पतंगे यांची व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहणारच.
कोणत्याही कार्याला ‘नाही ‘ म्हणणे हा त्यांचा स्वभाव नाही. कामाचा व्याप वाढत असतानाही जबाबदाऱ्या घेतच राहणे, हे हाडाचा शिक्षक असलेल्याचे लक्षण त्यांच्या ठायी वसलेले. कर्तव्य पार पाडताना दर्जा, गुणवत्ता टिकवून ठेवण्याचा सदैव अट्टाहास. अतिरिक्त कार्य, जबाबदारी प्राप्त झाली म्हणून उद्विग्नता, संताप नसलेले एक प्रसन्नचित्त व्यक्तिमत्व.
एम.कॉम., एमबीए, आणि एम. ए. अर्थशास्त्र अशा त्रिवेणी पदकांचा संगम असलेला प्रवाह. पदवी स्तरावरील २७ वर्ष, पदव्युत्तर २० वर्ष आणि संशोधनाचा १४ वर्ष अनुभव असलेला समृद्ध व शैक्षणिक श्रीमंती प्राप्त शिक्षक. पाच ग्रंथाचे लेखक आणि मान्यताप्राप्त दर्जेदार ४६ संशोधन पेपरचे धनी. दहा विद्यार्थ्यांची त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पूर्ण, सहा विद्यार्थ्यांना एम. फिल. प्राप्त आणि चार विद्यार्थ्यांचे पीएच.डी. संशोधन थेसिस दाखल.
गत पाच वर्षापासून उन्नत भारत अभियानाचे समन्वयक. तीन वर्ष राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी आणि विद्यापीठ व महाविद्यालयातील विविध समिती व उपक्रमात सक्रिय सहभाग न थकता देणारे शिक्षणयात्री.
असे बहुआयामी, बहुव्यापी व अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले डॉ.हरिश्चंद्र पतंगे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
-डॉ.अजय गव्हाणे,
राज्यशास्त्र विभागप्रमुख,
यशवंत महाविद्यालय, नांदेड.
Share

Related posts

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालया मध्ये शिवणकाम व ब्यूटीपार्लर कार्यशाळे चा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला

Chief Editor

एआयचे ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज”* *कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांचे पत्रकारांना आवाहन

Chief Editor

यशवंत ‘ मधील प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे राज्यस्तरीय सुयश

Chief Editor

लोकशाही मूल्य रुजविण्यासाठी युवा संसद महत्त्वाची ठरते : श्रीमती चंद्रकला रावळकर

Chief Editor

नांदेड जिल्ह्यात धनादेश अनादराची 23 प्रकरणे तडजोडीने निकाली; २९ लाख ४४ हजार रुपयांची वसुली

Chief Editor

पद्मश्री डॉ.स्मिता रविंद्र कोल्हे यांना सन २०२४- २५ या वर्षीचा कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार जाहीर.

Chief Editor

Leave a Comment