एम सी आर

यशवंत ‘ मधील प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे राज्यस्तरीय सुयश

Uncategorized

नांदेड :(दि. ११ ऑगस्ट २०२६)
यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील सुप्रसिद्ध जलतरणपटू व समाजशास्त्राचे प्रा.ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर यांनी श्री. शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी, पुणे येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत दोन ब्रांझ पदके पटकावली आहेत.
महाराष्ट्र अक्व्हेटिक असोसिएशनतर्फे स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र ऑलीम्पिक असोसिएशनच्या वतीने आयोजित महाराष्ट्र स्टेट मास्टर्स अक्वेटिक चॅम्पियनशिप: २०२६ राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेतील सुयशाबद्दल माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी प्रा. ओमप्रकाश गुंजकर यांचे यथोचित स्वागत केले आणि राष्ट्रस्तरीय जलतरण स्पर्धेत निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. नरेंद्र कंचटवार, लेफ्टनंट प्रा.श्रीकांत सोमठाणकर यांची उपस्थिती होती.
प्रा.गुंजकर यांचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयिका डॉ. एल. व्ही. पदमाराणी राव, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा.वंदना बदने, डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ. विरभद्र स्वामी, डॉ. मनोज पैंजणे, प्रा.उत्तम केंद्रे, डॉ. मुकेश धर्मले, प्रा.सचिन महिंद्रकर, प्रा.राहुल टिचकुले, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, बालाजी गाडे, सेवानिवृत्त वनअधिकारी गोपाळराव गुंजकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक किशोर गुंजकर, सेवानिवृत्त वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख व विद्यमान प्राचार्य डॉ. श्रीरंग बोडके, श्रीकांत गुंजकर, प्रा. एम. एस. कुलकर्णी, प्रा.बोकारे, खंडू देशमुख, राजेंद्र ताटे आदींनी अभिनंदन केले आहे.

Share

Related posts

व्यवस्था बदलल्याशिवाय स्त्रीमुक्ती अशक्य – कॉ. किरण मोघे

Chief Editor

प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांना भगिनीशोक आशाताई कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन;

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा रॅली उत्साहात

Chief Editor

२२ जानेवारी रोजी कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयात बोलींचा जागर कार्यक्रमाचे आयोजन.

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धा २ ते ६ एप्रिल दरम्यान

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठाच्या स्कूल ऑफ कॉम्प्युटेशनल सायन्सेसमध्ये प्रकल्प प्रदर्शन उत्साहात* *विद्यार्थ्यांच्या ३८ सॉफ्टवेअर प्रकल्पांचे सादरीकरण

Chief Editor

Leave a Comment