एम सी आर
Uncategorized

२२ जानेवारी रोजी कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयात बोलींचा जागर कार्यक्रमाचे आयोजन.

परभणी: प्रतिनिधी

मराठी भाषा विभाग , मंत्रालय मुंबई.भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य. मराठी विभाग ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त परभणी जिल्ह्यातील बोलींचा जागर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार , २२ जानेवारी २०२६ रोजी कमलताई जामकर सांस्कृतिक सभागृह,कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय, जिंतूर रोड , परभणी येथे सकाळी ९ ते दुपारी १ वाजे दरम्यान करण्यात आले आहे.
सदरील कार्यक्रमाचे उदघाटन हेमंतराव जामकर,( अध्यक्ष, नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्था,परभणी .) यांचे हस्ते होणार असून डॉ.पृथ्वीराज तौर ( सदस्य ,मराठी भाषा सल्लागार समिती महाराष्ट्र शासन , मराठी विभाग प्रमुख, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड ), विजयसिंह जामकर ( सचिव, नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्था,परभणी ) प्रमुख पाहुणे तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे यांची उपस्थिती असणार आहे.
बोलींचा जागर कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालया पासून सकाळी ९ वाजता ग्रंथ दिंडी , शोभायात्रेने करण्यात येणार आहे.यात पारंपरिक वेशभूषा करत कलावंत आणि सदगुरु बालासाहेब पौळ महाराज भजनी मंडळ बोलींचा जागर करणार आहेत.
दुसऱ्या सत्रात मुलतानी बोली विषयी प्रा.स्वाती काटे , तर कैकाडी बोली विषयी प्रा.डॉ.सुरेश कदम आपले अभ्यासपूर्ण विचार मांडणार आहेत.
या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने होणार असून पोवाडा ,लोकगीत ,गोंधळ ,
भारूड ,तुमडी गीत ,धनगरी गीत ,लोकवाद्य वृंद आदी
लोककला प्रकाराचे सादरीकरण शाहिर प्रा.डॉ.शिवराज शिंदे नांदेड ,प्रा.डॉ.रविंद्र इंगळे,प्रा.डॉ.पल्लवी कुलकर्णी,रवि सोनवणे आणि संच कै.सौ.कजाम महाविद्यालय परभणी,माऊली पाथरकर आणि संच कै.रावसाहेब जामकर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय,परभणी करणार आहेत.
बोलींचा जागर कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ.उदय सामंत (मा.मंत्री, मराठी भाषा व उद्योग,मंत्रालय मुंबई,महाराष्ट्र राज्य. ) डॉ.किरण कुलकर्णी ( सचिव, मराठी भाषा विभाग,मंत्रालय, मुंबई. )
विनित, अरुण गीते ,(भाषा संचालक,भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य.) यांचे मार्गदर्शना खाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे यशस्वीते साठी आयोजक प्राचार्य , डॉ.रामचंद्र भिसे यांचे मार्गदर्शना खाली समन्वयक मराठी विभाग प्रमुख प्रा.अरुण पडघन , प्रा.डॉ.आशा गीरी ,सर्व प्राध्यापक ,कर्मचारी कार्य करत आहेत .
सदरील कार्यक्रमा साठी परभणी जिल्ह्यातील कला, वाणिज्य, विज्ञान वरीष्ठ महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी , विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक याचे वतीने करण्यात आले आहे.

Share

Related posts

प्रो. राजाराम माने यांच्या संशोधन टीमच्या ‘विषारी वायू शोधक’ उपकरणाला केंद्र सरकारचे पेटंट

Chief Editor

पुलगाव येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत नांदेड जिल्ह्याच्या खेळाडूंची दैदिप्यमान कामगिरी

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Chief Editor

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी मोफत वाहतूक सुविधा;

Chief Editor

दिनांक 07 जानेवारी 2026 रोजी बी.सी.ए. विभागाकडून Data Science व AI या विषयावर एक दिवसीय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोज

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील साळवे यांना संगणक शास्त्रात पीएच.डी.

Chief Editor

Leave a Comment