एम सी आर
Uncategorized

शिबिरार्थी डॉ.अजय गव्हाणे संचालित ध्यानप्रयोगांनी ध्यानमग्न


नांदेड (दि. ४ जानेवारी २०२६)
यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाद्वारे आयोजित मौजे येळेगाव येथील शिबिरात राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. अजय गव्हाणे यांनी विविध ध्यानधारणा प्रयोगांनी शिबिरार्थ्यांना ध्यानमग्न केले.
माजी प्र-कुलगुरु डॉ. प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांचे मार्गदर्शन आणि नियोजनानुसार योगासने आणि ध्यानसत्राचे आवर्जून आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ध्यानमंचावर जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ.रमेश चिल्लावार, कार्यक्रमाधिकारी डॉ.कैलाश इंगोले, डॉ.राजरत्न सोनटक्के, प्रा. अभिनंदन इंगोले यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी लिसनिंग मेडिटेशन, सायलेंट सीटिंग, नृत्य ध्यान, हास्य ध्यान, मौनधारणा आदी ध्यानप्रयोग अत्यंत उत्साह व आनंदात संपन्न झाले.
प्रारंभी प्रास्ताविक डॉ. कैलास इंगोले यांनी केले.
शिबिर संचालक डॉ.अजय गव्हाणे यांनी, ध्यानधारणेसाठी निसर्ग सानिध्य, अव्यस्तता, शारीरिक सुदृढता व मौन इ. बाबी आवश्यक असल्याचे आवर्जून सांगितले.
प्रमुख अतिथी डॉ.रमेश चिल्लावार यांनी, सर्व प्रकारच्या प्रदूषणाने आधुनिक माणूस त्रस्त आहे. त्यामध्ये सर्वात भयावह मनाचे प्रदूषण आहे. मनावर नियंत्रण व संयमासाठी ध्यानधारणा आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
सूत्रसंचालन शुभम डक यांनी केले तर शेवटी आभार अनुपकुमार मस्के यांनी मानले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी अधीक्षक गजानन पाटील, निखिल सोनकांबळे, सुरज हैबते आदींनी सहकार्य केले.

Share

Related posts

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात जागतिक वारसा दिन उत्साहात साजरा

Chief Editor

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांना सतर्क राहण्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Chief Editor

यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

Chief Editor

जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा, साखरा येथे शाळा प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न!

Chief Editor

सावित्रीबाई नंतर आजहीअनेक महिला उन्नती पासून वंचित आहेत’ :डॉ. राजेंद्र गोणारकर

Chief Editor

माता रमाई यांच्या त्यागामुळे कोटी कोटी कुळांचा उद्धार -डॉ.अजय गव्हाणे

Chief Editor

Leave a Comment