एम सी आर

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Uncategorized

नांदेड (प्रतिनिधी):
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,परिसर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यापीठाच्या ‘दीक्षांत मंच’ येथे झालेल्या या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कला प्रकार व क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी भूषविले. प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार श्री. आनंद बोंढारकर, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार व नरेंद्र चव्हाण उपस्थित होते.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते योगेश शिरसाठ यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत कला, परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर यश कसे मिळवावे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी आपल्या विनोदी शैलीत नक्कल सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना वाव देण्यासाठी अशा व्यासपीठांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, वार्षिक स्नेहसंमेलन प्रभारी प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर, प्रभारी क्रीडा संचालक प्रा. डॉ. भास्कर माने यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच रासेयो विभागाचे संचालक डॉ. मारोती गायकवाड यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Share

Related posts

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात जागतिक वारसा दिन उत्साहात साजरा

Chief Editor

यशवंत बिब्लियोफाइल्स : वाचन संस्कृती जपणारा अतिशय स्तुत्य उपक्रम:

Chief Editor

भक्ती आणि शक्ती हे आयुष्य जिंकण्याचे सूत्र – संजय भोसले

Chief Editor

दिव्यांगता ही दया नव्हे, अधिकारांचा विषय* — डॉ. डी. एस. यादव

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठ ‘राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग’मध्ये देशात १२ व्या क्रमांकावर९२.५ गुणांसह ‘गोल्ड रेटिंग’; आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आय टी व केंद्रीय विद्यापीठांशी स्पर्धेत उल्लेखनीय यश

Chief Editor

प्रथम घटक चाचणी परीक्षेची गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पाहणी शालेय परीक्षा व्यवस्था व शैक्षणिक कामकाजाबाबत समाधान व्यक्त

Chief Editor

Leave a Comment