एम सी आर
Uncategorized

भक्ती आणि शक्ती हे आयुष्य जिंकण्याचे सूत्र – संजय भोसले

—————————————–
उदगीर :- आज विद्यार्थ्यांना आपले आयुष्य समृद्ध करण्यासाठी दोन प्रकारच्या शिक्षण पद्धतीची आवश्यकता आहे. एक म्हणजे आधुनिक शिक्षण तर दुसरे वैदिक शिक्षण.आधुनिक शिक्षण तुम्हाला करियर, विविध स्किल्स देते तर वैदिक शिक्षण तुम्हाला चारित्र्य देते एक उत्तम सुजान आणि राष्ट्राप्रती प्रेम असणारे नागरिक घडविण्यात वैदिक शिक्षणाची नितांत आवश्कता आहे.
या दोन्ही गोष्टी हातात हात घालून जेव्हा चालल्या जातात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सारखे व्यक्तिमत्व तयार होतात. छत्रपती शिवाजी महाराज हे शक्तीच प्रतीक आहे आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे भक्तीच प्रतीक आहे आपलं जीवन समृद्ध यशस्वी आणि खरोखर खऱ्या अर्थाने परिपूर्ण करायचे असेल तर भक्ती आणि शक्ती फार महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन इस्कॉन संस्थेचे उपाध्यक्ष संजय भोसले यांनी
स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय, स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ फार्मसी व स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने शै.वर्ष 2025-26 च्या वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी कल्याण मंडळाचे उद्घाटन करताना बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी ज्योती स्वामी, संस्थेच्या मनुष्यबळ विभागाच्या प्रमुख स्नेहा लांडगे, उद्योजक प्रशांत जगताप, फिटनेस ट्रेनर अलीम सर, अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य गोपाळ पवार, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ गणेश तोलसरवाड, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य संजय हट्टे, जय हिंद ज्युनिअर कॉलेजच्या मनोरमा शास्त्री, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.शेषनारायण जाधव, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अमर तांदळे, पत्रकारिता व विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रा. राहुल पुंडगे,स्वामी विवेकानंद महाविद्यालयांची विद्यार्थी प्रतिनिधी प्रतीक्षा बिरादार, फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी प्रतिनिधी विश्ववेश्वर चिलरागें, अध्यापक महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी विश्वनाथ मोरखंडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना संजय भोसले म्हणाले की, मुलांनी आदर्श जीवन जगाव कारण मित्रांनो जेव्हा आपण चांगलं ऐकतो चांगलं वाचतो चांगलं गातो चांगलं पाहतो चांगलं व्यवहार करतो आयुष्यामध्ये तेव्हाच आपल्या मनात चांगले जगण्याची आपल्याला प्रेरणा मिळते कारण जीवन हे प्रेरणा देण्यासाठी आहे.असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात डॉ. सुधीर जगताप म्हणाले की,भोसले सर यांनी यांनी अत्यंत ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आध्यात्मिक ज्ञान मिळवले आहे. त्यांनी पूर्णपणे स्वतःला या कार्यात झोकून दिले ते आज समाजा समोर एक आदर्श सेवा देत आहे आणि त्या सेवेचा एक आदर्श उदाहरण आपल्याला अंगीकृत करून घेता आले पाहिजे. इस्कॉन हे आज जवळपास 30 विद्यापीठासोबत कार्यरत आहे. येणाऱ्या काळात आमच्या स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर येथे देखील इस्कॉन सोबत कार्य करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू जेणे करून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणांबरोबरच आध्यात्मिक शिक्षणाची संधी मिळेल ज्यातून त्यांच्यात चांगल्या पद्धतीने परिवर्तन होईल असे ही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल जाधव, प्रा. अमर तांदळे यांनी तर आभार प्राचार्य डॉ. गोपाळ पवार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Share

Related posts

पद्मश्री डॉ.स्मिता रविंद्र कोल्हे यांना सन २०२४- २५ या वर्षीचा कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार जाहीर.

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धा २ ते ६ एप्रिल दरम्यान

Chief Editor

तरुणाई स्वतःचा शोध युवक महोत्सवातून घेतात -माजी राज्यमंत्री श्री.डी.पी.सावंत

Chief Editor

लोकशाही मूल्य रुजविण्यासाठी युवा संसद महत्त्वाची ठरते : श्रीमती चंद्रकला रावळकर

Chief Editor

संपलाही नाही संपणार नाही माझ्या भिमाचा दरारा* *कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते डॉ. शिवराज शिंदे यांच्या भीम गीताचे विमोचन

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा*

Chief Editor

Leave a Comment