एम सी आर
Uncategorized

ओशो ध्यान प्रयोगांद्वारे शांती, मौन, आनंदाची अनुभूती -डॉ.अजय गव्हाणे

नांदेड:( दि १९ जुलै २०२६)
भगवान रजनीश (ओशो) यांनी ध्यान प्रयोगांची अत्यंत सहज आणि सुगम रचना केली आहे. गीत, संगीत, नृत्य, मौन, हास्य, अश्रू अशा साध्या आणि सोप्या मार्गाचा अवलंब करून आधुनिक माणसाला ध्यान प्रयोगाद्वारे शांती, मौन आणि आनंदाची अनुभूती प्राप्त करून दिली आहे. प्रत्येक कृती ध्यानपूर्ण बनवण्याचा उत्कृष्ट मार्ग देऊन मानवी जीवन तणावमुक्त, सहज, आनंदमय बनविले आहे, असे प्रतिपादन यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख व ध्यानसाधक डॉ. अजय गव्हाणे यांनी केले.
भगवान रजनीश ब्लेसिंग्स मेडिटेशन कम्यून येथे दि. १९ जुलै रोजी दर रविवारी नित्य होणाऱ्या ध्यान साधनेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ओशोंद्वारे पन्नास वर्षांपूर्वी संन्यासीत स्वामी गोपाल भारती यांच्या विश्वप्रसिद्ध ‘ओशो मै हू तेरी बासुरी’ या गीतावर साधकांनी नृत्याचा आनंद घेतला तसेच याप्रसंगी सुनना ध्यान, ओंकार ध्यान, नृत्य ध्यान, सायलेंट सेटिंग हे विविध ध्यान प्रयोग आणि विविध विषयांवरील ओशोंची प्रवचने संपन्न झाली.
ध्यान प्रयोगांचा प्रा. महेंद्र देशमुख, सुरज डाके, अनिल दुधमल, शिवराज हुलसुरे, शामसुंदर थोरात, संदेश चव्हाण, अजिंक्य पवार आदी साधकांनी लाभ घेतला.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागराज भट, स्वामी प्रेम प्रशांत, मा सुगंधा, संगीता देशमुख, सुरेश धूत, प्रा.सुनील नेरळकर, प्रा. नारायण शिंदे, लक्ष्मण वानखेडे, गोविंद गव्हाणे, अधीक्षक गजानन पाटील यांनी सहकार्य केले.

Share

Related posts

नव्वद वाचकांनी नव्वद मिनिटे अनुभवला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अक्षर सहवास!

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Chief Editor

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे – सहाय्यक निबंधक अशोक राठोड यांचे आवाहन

Chief Editor

पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना कै. सौ. कमलताई जामकर दर्पण पुरस्कार प्रदान

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठामध्ये ‘आयरिन्स व इन्फ्लिबनेट सेवा’ राष्ट्रीय कार्यशाळा

Chief Editor

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त *एम.डी.हॉस्पिटल,नांदेड* येथे *मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर

Chief Editor

Leave a Comment