एम सी आर
Uncategorized

स्वारातीम विद्यापीठात ४ सप्टेंबर रोजी ‘संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास’ कार्यशाळेचे आयोजन

नांदेड:प्रतिनिधी

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ‘सेंटर फॉर कम्युनिकेशन स्किल्स’च्या (Centre for Communication Skills) वतीने शुक्रवारी, ४ सप्टेंबर २०२६ रोजी ‘संभाषण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर विशेष एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा विद्यापीठाच्या सिनेट हॉल (Senate Hall) येथे दुपारी २:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत पार पडणार आहे.
कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा दुपारी २:०० ते २:३० या वेळेत संपन्न होईल. या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर उपस्थित राहणार आहेत. तसेच प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
उद्घाटनानंतर दुपारी २:३० ते ३:०० या वेळेत कार्यशाळेची पूर्वतयारी होईल. त्यानंतर आयोजित विविध सत्रांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सत्र १: ‘संभाषण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर सेंटर फॉर एक्सटर्नल एज्युकेशनचे संचालक प्रा. प्रकाश निहलानी मार्गदर्शन करतील. तर सत्र २: थीम-बेस्ड टॉक्स: डॉ. वैजनाथ अनमुलवाड: भाषिक कौशल्ये आणि करिअर, डॉ. योगिनी सातारकर: अकादमिक लेखनाची मूलतत्त्वे Basics of Academic Writing, मो. झिशान अली: स्पॅनिश भाषा व जागतिक शिक्षण, करिअर व संसकृती, डॉ. नीना गोगटे: परकीय भाषा कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी यावर मागर्दर्शन करणार आहेत.
सायंकाळी ५:०० ते ६:०० या वेळेत कार्यशाळेचा समारोप सोहळा पार पडेल. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाच्या मानव्यविद्या विद्याशाखेचे अधिष्ठाता (Dean, Faculty of Humanities) प्रा. पराग खडके उपस्थित राहतील.
या कार्यशाळेचे आयोजन सेंटर फॉर कम्युनिकेशन स्किल्सचे समन्वयक प्रा. दिलीप चव्हाण आणि विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. ज्ञानेश्वर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी आणि इच्छुकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
———————

Share

Related posts

यशवंत ‘ मध्ये पर्यावरण संवर्धन, झिरो प्लास्टिक, ग्रीन कॅम्पस मिशनसाठी कृतिशील उपक्रम

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात आशाताई जाधव (शिंदे) यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Chief Editor

आर्यनचे जीवन क्षेत्र पुनर्संचयित करणाऱ्या प्रकल्पावर संशोधन

Chief Editor

भाग्यनगर साहित्य सेवा संगमचा २३ वा स्थापना दिवस उत्साहात; डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वाटचाल आवश्यक – गजानन बिडकर यांचे प्रतिपादन.

Chief Editor

दिल्लीचे उद्योग,अन्न व नागरी पुरवठा,वने मंत्री सरदार मनजींदर सिघ सिरसा यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन व स्वागत

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

Leave a Comment