https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत येथे गोशाळेच्या बांधकामाच्या खड्ड्यात पडून सात वर्षीय बालकाचा मृत्यू

मानवत / प्रतिनिधी.
मानवत शहरातील गोरक्षणच्या संरक्षण भिंतीच्या आवारामध्ये खोदलेल्या खड्डयात पडून बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पावरलूमच्या परिसरात राहणारा 6 वर्षीय मुलगा खेळता खेळता खड्डया जवळ गेला असता पाय घसरून पडत त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना १९ जुलै रोजी सायंकाळी पाच वजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, मानवत शहरातील पावरलूमच्या बाजूला असलेल्या गोरक्षण मैदानाच्या आवारात काही कामासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचले असून या खड्ड्यात जुम्मन प्लॉट परिसरात राहणारा शेख तौफिक शेख अल्ताफ हा सहा वर्षीय मुलगा खेळत खेळत या खड्ड्या जवळ आला सध्या पाऊस पडला असल्याने खड्ड्याच्या बाजूला चिखल झालेला होता या चिखलामध्ये पाय घसरून तो पाण्यात पडला खड्ड्यात पाणी जास्त प्रमाणात असल्याने त्याच्या नाका तोंडात पाणी जाऊन तो पाण्यामध्ये बुडाला त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला दरम्यान ही घटना त्याच्या आजोबांना कळताच त्याला पाण्याबाहेर काढून तात्काळ मानवत ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले असता उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची उत्तरीय तपासणी केली व त्याला मृत घोषित केले. सदरील घटनेची माहिती मानवत पोलीस स्टेशनला मिळताच मानवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रमेश गिरी यांच्या सह पोलीस उपनिरीक्षक किशोर गावंडे व किशनराव पतंगे पो. ना. शेखमुन्नू ,

नारायण सोळंके आदीचे पथक दाखल झाले सदर घटनेची नोंद घेऊन त्यांनी पंचनामा केला व त्यानंतर मानवत ग्रामीण रुग्णालयात या बालकावर शवविच्छेदन करण्यात आले डॉ. आदिती मोडक यांनी त्याचे शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. ही घटना कळताच त्या प्रभागाचे नगरसेवक राजु भैया खरात , नियमात खान पठाण, सामाजिक कार्यकर्ते शैलेशजी वडमारे, दिपक ठेंगे ,सुरेंद्र खरात यांचे सह बऱ्याच प्रमाणत नागरिकांनी दवाखान्यात गर्दी केली होती.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704