एम सी आर
Uncategorized

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे – सहाय्यक निबंधक अशोक राठोड यांचे आवाहन

देगलूर, दि. २६ जुलै २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication), ॲग्रीस्टॅक (AgriStack) नोंदणी, फार्मर आयडी पडताळणी तसेच संबंधित माहिती अद्ययावत करण्याची विशेष मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व पात्र शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्र (CSC), सेतू सुविधा केंद्र, बँका, गटसचिव आणि संबंधित यंत्रणांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन श्री. अशोक राठोड, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, देगलूर, बिलोली व धर्माबाद यांनी केले आहे.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी, फार्मर आयडी आणि आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी आधार कार्ड व आवश्यक कागदपत्रांसह जवळील शासनमान्य आपले सरकार सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र किंवा संबंधित बँक शाखेत जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी.
आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी शासनाने निर्धारित केलेल्या मानक कार्यपद्धती (SOP) चे काटेकोर पालन करावे. प्रमाणीकरणापूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज खात्याची माहिती, आधार क्रमांक व इतर आवश्यक तपशील स्पष्टपणे दाखवून नियमानुसार संमती अथवा असहमतीची नोंद घ्यावी. माहितीमध्ये कोणतीही विसंगती आढळल्यास संबंधित प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी संबंधित यंत्रणेकडे पाठविण्यात येईल.
संबंधित बँकांनी कर्ज खात्यांची माहिती अद्ययावत ठेवून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे. तसेच गटसचिवांनी गावपातळीवर व्यापक जनजागृती करून पात्र लाभार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे.
माननीय जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना :
सर्व बँकांच्या पात्र लाभार्थी याद्या सहाय्यक निबंधक, बँका व गटसचिव यांच्या समन्वयातून १०० टक्के प्रसिद्ध कराव्यात.
लाभार्थी याद्या संबंधित संस्था, बँक शाखा, ग्रामपंचायत व तलाठी सज्जा नोटीस बोर्डावर प्रसिद्ध कराव्यात.
फार्मर आयडी नसलेल्या पात्र शेतकऱ्यांनी तो तातडीने प्राप्त करून घ्यावा.
सर्व पात्र लाभार्थ्यांचे आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.
प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्रावर शासनाने दिलेल्या SOP ची स्टँडी दर्शनी भागात लावावी.
योजनेच्या अंमलबजावणीचा प्रगती अहवाल वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयास सादर करावा.
शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवता केवळ शासनमान्य आपले सरकार सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र, संबंधित बँक शाखा अथवा अधिकृत यंत्रणेमार्फतच ॲग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करावी. प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आल्यास संबंधित बँक शाखा, आपले सरकार सेवा केंद्र किंवा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, देगलूर, बिलोली व धर्माबाद यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
– श्री. अशोक राठोड
सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था
देगलूर, बिलोली व धर्माबाद.

Share

Related posts

परभणी-पुणे ट्रॅव्हल्सची दुचाकीला भीषण धडक; मानवतचे ४ तरुण जागीच ठार, राहुल जिनिंगसमोरील घटना

Chief Editor

मुक्त विद्यापीठाच्या रोजगार मेळाव्यात शेकडो युवकांना नोकरीची संधी (३५ नामांकित कंपन्यांचा सहभाग — पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे)

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘विकास अध्ययन’ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय खगोलभौतिकी परिषद

Chief Editor

फार्मा शिक्षक क्रिकेट स्पर्धेत स्वामी विवेकानंद फार्मसीचा संघ विजेता

Chief Editor

अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात नांदेडमध्ये ९ ऑगस्ट रोजी अनुसूचित जातीतील ५९ जातीचा महामोर्चा

Chief Editor

Leave a Comment