एम सी आर
Uncategorized

यशवंत ‘युवकांचा .डी.पी. सावंत यांच्या उपस्थितीत द्विमार्गी ऑनलाईन संवाद

नांदेड:( दि. २८ ऑगस्ट २०२६)
राष्ट्रीय क्रीडा दिन:२०२६ निमित्त मेरा युवा भारत यांच्यावतीने युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत ‘खेलो इंडिया संवाद: खेल की बात, पी.एम.के साथ’ हा राष्ट्रव्यापी माननीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांचा युवकांशी ऑनलाइन संवाद कार्यक्रम दि. २७ ऑगस्ट रोजी यशवंत महाविद्यालयात द्विमार्गी ऑनलाईन संवादाने यशस्वीरित्या उत्साहात संपन्न झाला.
महाराष्ट्रातील निवडक शैक्षणिक संस्थांपैकी यशवंत महाविद्यालयाला द्विमार्गी संवादाची संधी प्राप्त झाली होती.
पहिल्या सत्रामध्ये माननीय प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांनी युवकांशी संवाद साधतांना, युवकांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा, निरोगी राहावे, अपयशातून शिकावे, व्यसनांपासून दूर राहावे आणि आपल्या क्रीडा-कौशल्याचा उपयोग राष्ट्रनिर्माणासाठी करावा. युवकांची ऊर्जा आणि भारताची क्रीडाशक्ती एकत्र आली तर विकसित भारताचे स्वप्न अधिक वेगाने साकार होईल, असा संदेश दिला.
दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राचे माजी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री मा. श्री. डी.पी.सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे, जिल्हा युवा अधिकारी अशनी कानकटे, एन.आय.सी.चे प्रदीप डुमणे, आंतरराष्ट्रीय खेळाडू बाबू मेटकर, नागेश लुटे आणि राष्ट्रीय खेळाडू पोलीस खात्यातील ए.एस.आय. लोणमुद्रा आणेराव, लवकुश जाधव यांनी स्थानिक खेळाडूंना व स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. यावेळी युवकांना नशा मुक्तीची शपथ देण्यात आली.
याप्रसंगी मा.डी.पी.सावंत यांनी, श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटीने भव्य इनडोअर स्टेडियम कॉम्प्लेक्सची उभारणी केलेली आहे. खेळ जगतासाठी सुविधा प्राप्त करून देण्यामध्ये संस्था सदैव अग्रेसर आणि सकारात्मक आहे; मात्र खेळाडूंनी याचा लाभ घेऊन प्रावीण्य संपादन करण्याची नितांत गरज आहे, अशी भावना व्यक्त केली. तदनंतर खेळ जगताच्या बाबतीत उपस्थितांनी खुली चर्चा केली.
सूत्रसंचालन डॉ.शिवाजी सूर्यवंशी यांनी केले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.साईनाथ बिंदगे, डॉ. रत्नमाला म्हस्के, क्रीडा संचालक डॉ. मनोज पैंजणे यांनी परिश्रम घेतले तसेच लेफ्टनंट प्रा.श्रीकांत सोमठाणकर, डॉ. अजय गव्हाणे, संदीप पाटील, कालिदास बिरादार, गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांनी सहकार्य केले.

Share

Related posts

स्वच्छ यशवंत परिसर अभियान उत्साहात संपन्न

Chief Editor

भगवान रजनीश संबोधी दिनी सक्रिय ध्यान अभियान समारोप सोहळा

Chief Editor

बेरोजगार तरुणांसाठी २७ मार्च रोजी रोजगार मेळावा; २००० पेक्षा अधिक रिक्त पदांची संधी; डॉ. यशवंत कलेपवार

Chief Editor

‘यशवंत ‘मधील डॉ.मीरा फड यांची आयआयपीएच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

Chief Editor

नांदेड पोलीसांची धडक कारवाई : ८४ ‘फटाका सायलेंसर’ जप्त, रोड रोलरने नष्ट

Chief Editor

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे – सहाय्यक निबंधक अशोक राठोड यांचे आवाहन

Chief Editor

Leave a Comment