एम सी आर
Uncategorized

पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना कै. सौ. कमलताई जामकर दर्पण पुरस्कार प्रदान

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

परभणी (९) मेळघाट परिसरातील आदिवासींच्या शिक्षण, आरोग्य तसेच ग्रामविकासाच्या संदर्भात ज्यांनी संपूर्ण जीवनभर समर्पित कार्य करून परिवर्तन घडविले अशा पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना यावर्षीचा कै. सौ. कमलताई जामकर ‘दर्पण’ पुरस्कार सोमवार (दि.०९) रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
सदरील पुरस्कार महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आमदार रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष तथा नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर, प्रमुख उपस्थितीत पद्मश्री डॉ.रवींद्र कोल्हे, आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार राजूभैय्या नवघरे, आमदार राजेश विटेकर, माजी जिप उपाध्यक्ष अँड. बाळासाहेब जामकर, मनपा गटनेते विजय जामकर, संचालक मंगेशराव सुभेदार, माजी सभापती भावनाताई नखाते, निवड समितीचे सचिव अनिल मोरे, प्रा.किशन चोपडे, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, जिप सदस्य संग्राम जामकर, अजिंक्य जामकर तसेच आयोजक प्राचार्य डॉ.रामचंद्र भिसे यांची उपस्थिती होती. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शॉल तसेच रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सत्काराला उत्तर देताना डॉ.स्मिता कोल्हे म्हणाल्या, आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांची योग्यता नाही असे नाही तर त्यांना संधी नसल्याने त्यांच्या विकासाचा अनुशेष राहिला आहे. शिक्षण कमी असले तरीही आजही आदिवासी समाजात मुलींचा जन्म झाला की तीन दिवसांचा उत्सव साजरा केला जातो, एकही स्त्रीभ्रूण हत्या होत नाही, कोणत्याही स्त्रीचा विनयभंग होत नाही उलट ती प्रतिकार करायला सक्षम असते. त्यांच्याकडे आईवडिलांचा सांभाळ चांगल्या पद्धतीने केला जातो, कुटुंबातील एकही वयोवृद्ध माणूस वृद्धाश्रमात जात नाही. चोरी होतं नाही, या आणि अनेक चांगल्या गोष्टी आहेत. परंतु दुःख या गोष्टीचे आहे की आजपर्यंत त्यांच्यापर्यंत विकासाची गंगा पोहचली आहे. आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास तिथपर्यंत गेले नाही. आदिवासींचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर फक्त शासकीय प्रयत्नासोबत सर्व समाजस्तरातून प्रयत्न व्हायला हवेत असे सांगत त्यांनी मेळघाटातील सेवाकार्यातील स्वानुभव उपस्थितांना सांगितले. आपल्या भाषणात रुपालीताई चाकणकर म्हणाल्या, कोल्हे दाम्पत्यांनी आदिवासी भागात सेवा देऊन अमृताचे झाड लावले. त्यांची ही सेवा समाजासाठी आदर्शवादी आहे. सेवाकार्याला देव मानून त्यांनी समाजसेवा केली. स्मिताताईंचा जीवन प्रवास सकारात्मक दृष्टीने घेऊन हा वारसा आजच्या युवा पिढीने पुढे चालवावा. आज दिलेला दर्पण पुरस्कार समाजसेवा करणाऱ्या लेकीला देण्यात आला आहे, यामुळे नक्कीच पुरस्काराचे मूल्य वाढले आहे. या निमित्ताने दर्पण पुरस्कारासारखे कोल्हे दाम्पत्यांचे प्रतिबिंब समाजावर पडावे अशी आशा व्यक्त केली. अनिल मोरे यांनी माजीमंत्री स्व.रावसाहेब जामकर यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक कार्याला उजाळा देत वात्सल्यमुर्ती कै.सौ.कमलताई जामकर यांच्या आठवणी व्यक्त केल्या. यावेळी आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार राजुभैय्या नवघरे, आमदार राजेश विटेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी जामकर, सुभेदार, टाकळकर परिवारातील सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे यांनी केले, सुत्रसंचलन प्रा.अरुण पडघन, मानपत्र वाचन डॉ.जयंत बोबडे, स्वागतगीत डॉ.रवींद्र इंगळे आणि संचाने सादर केले तर आभार संग्राम जामकर यांनी मानले. यावेळी शिक्षण, वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ: पद्मश्री डॉ.स्मिता कोल्हे यांना यावर्षीचा कै. सौ. कमलताई जामकर दर्पण पुरस्कार प्रदान करताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, अध्यक्ष हेमंतराव जामकर, डॉ.रवींद्र कोल्हे, आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार राजूभैय्या नवघरे, आमदार राजेश विटेकर, अँड. बाळासाहेब जामकर, विजय जामकर, मंगेशराव सुभेदार, भावनाताई नखाते, अनिल मोरे, प्रा.किशन चोपडे तसेच प्राचार्य डॉ.रामचंद्र भिसे दिसत आहेत.

Share

Related posts

पुलगाव येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत नांदेड जिल्ह्याच्या खेळाडूंची दैदिप्यमान कामगिरी

Chief Editor

ओशो ध्यानधारणेने गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘विकास अध्ययन’ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू

Chief Editor

यशवंत ‘ मधील श्रेयस चव्हाण यांची भारतीय नौसेनेमध्ये निवड

Chief Editor

हिंदी केवळ भाषा नव्हे, रोजगाराचे प्रभावी माध्यम -डॉ. एम. के. खाजी

Chief Editor

नांदेडमध्ये १२ ऑगस्टपासून राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २७० खेळाडूंचा सहभाग; सलग २२ वर्षांची परंपरा कायम — सुंदर शेट्टी यांना जीवनगौरव पुरस्कार

Chief Editor

Leave a Comment