एम सी आर
Uncategorized

स्वारातीम विद्यापीठात ‘अमृत कौशल्य उद्यम विकास योजना’अंतर्गत* *मोफत कौशल्य व उद्योजकता प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

नांदेड:
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘अमृत कौशल्य उद्यम विकास योजना’ अंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील कौशल्य विकास केंद्रामार्फत मोफत कौशल्य व उद्योजकता आधारित प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हे प्रशिक्षण कार्यक्रम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले जात असून, एस्पायर ज्ञान व कौशल्य इंडिया प्रा.ली. या संस्थेच्या सहकार्याने गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण दिले जाणार आहे.
विद्यापीठाचे कौशल्य विकास केंद्र खालील अभ्यासक्रमांसाठी अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून कार्य करणार आहे. यामध्ये
डिजिटल व विक्री-विपणन कार्यकारी, भ्रमणध्वनी हार्डवेअर दुरुस्ती तंत्रज्ञ तसेच चित्रसजीवक (अ‍ॅनिमेशन तज्ज्ञ) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अभ्यासक्रमांचा कालावधी ३ ते १२ महिन्यांचा असून, दहावी व बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही प्रशिक्षण संधी उपलब्ध आहे.
हे सर्व अभ्यासक्रम पूर्णतः मोफत असून, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढण्यासोबतच स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या योजनेसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) खुल्या प्रवर्गातील लाभार्थी पात्र असून, बेरोजगार व अल्परोजगार युवक, उद्योजक होण्याची इच्छा असलेले उमेदवार, अर्धकुशल व्यक्ती तसेच गृहिणी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
अधिक माहिती व नोंदणीसाठी कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. सुरेंद्र गट्टानी (९९७०८१६९२७) आणि अभ्यासक्रम समन्वयक डॉ. रणजीतसिंह तेहरा (८८५५०००३५३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
——

Share

Related posts

मुक्त विद्यापीठाच्या रोजगार मेळाव्यात शेकडो युवकांना नोकरीची संधी (३५ नामांकित कंपन्यांचा सहभाग — पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे)

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

लोकशाही बळकट करण्यासाठी सक्षम प्रशासक घडणे काळाची गरज – डॉ. दीपक वाघमारे

Chief Editor

यशवंत युवक महोत्सवातील बोधचिन्ह स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

मांडवी येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा जे

Chief Editor

यशवंत : दैदीप्यमान सुयशाचे शिखर (लेखक:डॉ.अजय गव्हाणे)

Chief Editor

Leave a Comment