एम सी आर
Uncategorized

डॉ.अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवाद आणि संविधानवादाचे सुरेख मिश्रण -डॉ. बी. एस. वाघमारे

नांदेड:(दि. २ ऑगस्ट २०२६)
साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रत्येक साहित्य कलाकृतीत मानवतावाद, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि समतामुलक समाजाच्या निर्मितीची मूल्य आहेत. समकालीन साहित्यिकांनी अण्णाभाऊंच्या साहित्याकडे दुर्लक्ष केले; मात्र अण्णाभाऊंच्या निर्वाणानंतर ते वैश्विक साहित्यिक आहेत; हे सर्व जगाने मान्य केले आहे. डॉ.अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवाद आणि संविधानवादाचे सुरेख मिश्रण असल्याचे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, नवी दिल्ली येथील राज्यशास्त्राचे सेवानिवृत्त डॉ.बी.एस. वाघमारे यांनी केले.
यशवंत महाविद्यालयात साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार यशवंत प्रबोधन व्याख्यानमालेत ‘अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीची समीक्षा’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा पुरोगामी व स्त्रीवादी विचारवंत व वक्ते डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. साईनाथ शाहू, डॉ.हनुमंतलू तमलुरकर यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ.बी.एस. वाघमारे यांनी, विद्यार्थ्यांना डॉ. अण्णाभाऊंच्या लेखनाने प्रेरित होऊन लेखन करावे, असे आवाहन केले. तंत्रज्ञानाच्या अतिवापराने हस्तलेखन मागे पडत असल्याने तरुणांचा सर्वांगीण बौद्धिक विकास खुंटला आहे. निश्चितच तंत्रज्ञानाचा प्रत्येक क्षेत्रात वापर व्हावा; मात्र स्वहस्तेलेखन विकासासाठी महत्त्वपूर्ण घटक आहे. डॉ. अण्णाभाऊंनी लेखनाद्वारे क्रांतीचे तत्व जनमानसात रुजविले, यासाठी विद्यार्थ्यांवर लेखनाचे संस्कार व्हावे; असे सांगितले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. कविता सोनकांबळे यांनी, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी उपेक्षित, दुर्लक्षित स्त्रीला आपल्या प्रत्येक ग्रंथाची नायिका बनविले. डॉ. अण्णाभाऊंनी विश्वामध्ये परिवर्तन करण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारक मार्गाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले तसेच श्रमिकांच्या श्रमाला प्रतिष्ठा आणि अंधश्रद्धेविरुद्ध मानसिकता तयार करण्यासाठी कष्टकरी, कामगार यांच्या तळहातावर विश्व तरलेले आहे, असे मनोगत व्यक्त केले.
उत्कृष्ट सूत्रसंचालन बी.ए.प्रथम वर्षाची विद्यार्थिनी कु.मोहिनी लिंगायत, प्रमुख अतिथींचा परिचय कु.समीक्षा वाघमारे आणि शेवटी आभार डॉ.साईनाथ शाहू यांनी मानले.
याप्रसंगी माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, प्रा. कैलास डाड, प्रा. जी. एल. सूर्यवंशी, श्री. रानवळकर, श्री. किन्हाळकर, श्री. वाघमारे, डॉ.अजय गव्हाणे, डॉ. वीरभद्र स्वामी, डॉ.रामराज गावंडे, डॉ.भरत कांबळे, डॉ.शिवराज बोकडे, प्रा. विद्या सावते, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. वंदना बदने, डॉ. संगीता मसारे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, राजू अडबलवार, नाना शिंदे यांनी सहकार्य केले.

Share

Related posts

स्वामी विवेकानंद संकुलात जागतिक महिला दिवस साजरा

Chief Editor

२३ ते २८ फेब्रुवारी दरम्यान यशवंत वार्षिक युवक महोत्सवाचा जागर आणि जल्लोष

Chief Editor

यशवंत ‘मधील डॉ.मीरा फड यांची आयआयपीएच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा*

Chief Editor

नांदेड SBI सोनेतारण घोटाळ्यातील मुख्य आरोपी आदित्य सेनगावकरचा राजस्थानमध्ये गूढ मृत्यू

Chief Editor

भगवान रजनीश संबोधी दिनी सक्रिय ध्यान अभियान समारोप सोहळा

Chief Editor

Leave a Comment