एम सी आर

स्वामी विवेकानंद संकुलात जागतिक महिला दिवस साजरा

Uncategorized

—————————————–
उदगीर :- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर या संस्थेच्या स्वामी विवेकानंद महाविद्यालय,स्वामी विवेकानंद फार्मसी कॉलेज,स्वामी विवेकानंद नर्सिंग कॉलेज, जय हिंद पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील प्राध्यापिका, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर सर्व 125 महिला कर्मचाऱ्याचा सत्कार करून जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष डॉ. सुधीर जगताप तर प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुलोचना येरोळकर, स्किन आणि लाईफस्टाईल कोच व उद्योजिका डॉ. मोहिनी अचोले, संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी ज्योती स्वामी, संस्थेच्या एच.आर मॅनेजर स्नेहा लांडगे, प्राचार्य डॉ. गणेश तोलसरवाड, प्राचार्य संजय हट्टे, उपप्राचार्य गणेश नागुरण, उपप्राचार्य डॉ. शेषनारायण जाधव, उपप्राचार्य दिग्विजय केंद्रे, प्र. प्राचार्य प्रिन्सी बी,प्रा.अमर तांदळे, पत्रकारिता व परीक्षा विभाग प्रमुख प्रा. राहुल पुंडगे, मनोरमा शास्त्री, सतीश वाघमारे, धोंडीबा शिंदे, भाग्यश्री वांगवाड यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित महिलाना मार्गदर्शन करतांना डॉ. सुलोचना येरोळकर म्हणाल्या की, आज प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन काम करीत आहे. ताठ मनाने समाजात वावरत आहे. एक महिला म्हणून तिला कधी मुलगी, आई, बहीण, सून, सासू अशा वेगवेगळ्या रूपात भूमिका निभावावी लागते आणि ती उत्तम पणे निभावते देखील. पण हे करत असताना तिने स्वतः कडे लक्ष देण्याची आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी वेळ काढला पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे जेणे करून मन शांत आणि ताण तणावा पासून दूर राहता येईल असे ही त्या म्हणाल्या.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात डॉ.सुधीर जगताप असे म्हणाले की,आज सर्वच क्षेत्रात महिलाचे योगदान उल्लेखनीय आहे. देशांची अर्धी लोकसंख्या असलेल्या महिला आज समाजात ताठ मानाने उभ्या आहेत.आपल्या जीवनात महिला अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात.प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक महिला असते त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या कुटुंबातील आणि समाजातील योगदाना बद्दल आपण नेहमीच त्यांचा गौरव आणि स्वाभिमान जपला पाहिजे असे हि ते म्हणाले. यावेळी त्यांच्या हस्ते इनक्यूबेशन सेंटर चे देखील उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य संजय हट्टे यांनी तर आभार प्राचार्य डॉ. गणेश तोलसरवाड यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Share

Related posts

बदलत्या जीवनशैलीत योग्य आहाराचे महत्त्व – मीरा धुळगुंडे”

Chief Editor

श्री शारदा भवन हायस्कूल, अर्धापूर येथे डॉ. शंकरराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी नांदेडमध्ये मातंग समाजाचा विराट जनआक्रोश महामोर्चा.

Chief Editor

उर्दूमधून भगवद्गीतेचे लेखन; फातिमा ताईंनी लोकनेते प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना दिली आवृत्ती

Chief Editor

स्वा. रा. ती. म. विद्यापीठाचा संघ राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी रवाना

Chief Editor

ने.सु.बो चा एनसीसी कॅडेट गणेश पिसाळ यांची सी.आर. पी.एफ मध्ये निवड

Chief Editor

Leave a Comment